Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Curvv SUV : Curvv SUV पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक पर्यायासह होणार लॉन्च! मिळणार ही खास वैशिष्ट्ये

टाटा मोटर्स लवकरच त्यांची Curvv एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. या कारवर कंपनीकडून वेगाने काम सुरु केल्याचे दिसत आहे. ही कार चाचणी दरम्यान अनेकदा दिसून आली आहे.

0

Tata Curvv SUV : टाटा मोटर्सकडून आगामी काळात त्यांच्या नवीन एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यासाठी टाटा मोटर्सने कंबर कसल्याचे दिसत आहे. एसयूव्ही कारच्या मागणीत वाढ झाल्याने टाटा मोटर्स त्यांच्या नवीन एसयूव्ही कार सादर करणार आहे.

टाटा मोटर्सची Curvv एसयूव्ही कार २०२३ च्या ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली होती. आता या कारची चाचणी देखील सुरु झाली आहे. अनेकदा ही कार चाचणी दरम्यान रस्त्यावर दिसून आली आहे.

टाटा मोटर्स त्यांच्या आगामी Curvv एसयूव्ही कारमध्ये तीन इंजिन पर्याय देण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह Curvv एसयूव्ही कार भारतीय ऑटो बाजारात दाखल केली जाऊ शकते.

टाटा मोटर्स सर्वात प्रथम Curvv एसयूव्ही कार इलेक्ट्रिक पर्यायामध्ये सादर करू शकते. त्यानंतर पेट्रोल अंडी डिझेल इंजिन पर्यायासह ही कार सादर केली जाऊ शकते. या कारमध्ये अत्याधुनिक फीचर्स दिले जाऊ शकतात.

टाटा Curvv लॉन्च टाइमलाइन

टाटा मोटर्सच्या आगामी Curvv एसयूव्ही कार लवकरच भारतात सादर केली जाऊ शकते. ही कार २०२३ च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती. अलीकडेच टाटा मोटर्सने त्यांच्या सफारी आणि हॅरियर या दोन एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे.

टाटा मोटर्सचे चेअरमन चंद्रशेखरन यांनी सांगितले होते की टाटा मोटर्स २०२४ च्या पहिल्या तीन महिन्यात कोणतीही कार सादर करणार नाही. मात्र आता २०२४ च्या सुरुवातीला टाटा मोटर्सची Curvv एसयूव्ही कार सादर केली जाऊ शकते.

टाटा Curvv ची वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सकडून त्यांच्या आगामी Curvv एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. या कारचा लूक पूर्णपणे नवीन डिझाईनवर आधारित असणार आहे. पुढच्या बाजूस बोनेटसह एलईडी स्ट्रिप्स पाहायला मिळतील.

तसेच Curvv एसयूव्ही कारमध्ये स्पोर्टी बंपर आणि स्लिम हेडलॅम्पसह स्टायलिश अलॉय व्हील्स कारमध्ये दिले जातील. Curvv एसयूव्ही कारमध्ये नवीन 1.5-लीटर टर्बो इंजिन दिले जाईल जे 125 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच कारला मजबूत बॅटरी पॅक देखील दिला जाईल त्यामुळे ही कार ५०० किमीपेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल.