Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Harrier And Safari Facelift : टाटाच्या शक्तिशाली हॅरियर आणि सफारीमध्ये होणार हे ५ मोठे बदल, पहा व्हिडीओ

टाटा मोटर्सकडून लवकरच त्यांची हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट या एसयूव्ही कार लवकरच लाँच केल्या जाणार आहेत. यामध्ये अनेक नवीन बदल करण्यात येणार आहेत.

0

Tata Harrier And Safari Facelift : टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक एसयूव्ही कार सादर केल्या जाणार आहेत. नुकतेच त्यांनी Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कार सादर केली आहे. टाटाची सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. आता टाटा मोटर्सकडून हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट कार सादर केल्या जाणार आहेत.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या आगामी हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट कारचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. या कार अनेकदा रस्त्यावर चाचणी ड्रमायन दिसून आल्या होत्या. या कारमध्ये 2.0 लिटर 4-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कारमध्ये देण्यात येणारे 2.0 लिटर 4-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन 170 पीएस पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 6-स्पीड MT किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर AT शी जोडले जाईल. तसेच कारमध्ये अनेक नवीन बदल पाहायला मिळतील.

इंटेरियर आणि वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सकडून त्यांच्या आगामी हॅरियर आणि सफारी फेसलिफ्टचा पहिलाच अधिकृत टिझर रिलीज केला आहे. कारमध्ये 10.25-इंच इन्स्ट्रुमेंट कन्सोल, टाटा लोगोसह नवीन 4-स्पोक स्टीयरिंग व्हील, डॅशबोर्डच्या रुंदीला कव्हर करणारी सभोवतालची लाईट्स, 12.3-इंचाची फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम अशी नवीन वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात.

नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

टाटा हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट कारमध्ये ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर नेक्सॉन प्रमाणेच सानुकूलित डिस्प्लेसह मिळू शकते. 12.3-इंचाच्या मोठ्या युनिटसह त्याचे टॉप एंड व्हेरियंट ऑफर केले जाऊ शकते. बाकीच्या व्हेरियंटमध्ये 10.25-इंच स्क्रीन दिली जाऊ शकते.

प्रीमियम डॅशबोर्ड

हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये नवीन डॅशबोर्ड पाहायला मिळू शकतात. कारचा डॅशबोर्ड प्रीमियम लेदर फिनिश आणि अपडेटेड HVAC व्हेंटसह दिला जाऊ शकतो.

नवीन केंद्र कन्सोल

टाटा मोटर्स कर्व्ह संकल्पनेवर काम करत आहे. आगामी काळात या संकल्पनेवर टाटाच्या अनेक कार सादर केल्या जाणार आहेत. Nexon फेसलिफ्ट कारमध्ये देखील कर्व्ह डिझाईन देण्यात आले आहे. कारमध्ये नवीन सेंटर कन्सोलमध्ये नवीन रोटरी ड्राइव्ह सिलेक्टर आणि गियर लीव्हर असणार आहे.