Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Harrier EV : टाटाच्या नव्या इलेक्टिक कारचे फोटो झाले व्हायरल ! भारताची Tesla कार असेल इतक्या किंमतीची पहा रेंज आणि लॉन्चिंग तपशील

टाटा मोटर्सची आगामी Harrier EV एसयूव्ही कार चाचणी दरम्यान पहिल्यांदाच समोर आली आहे. लवकरच ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये पाहायला मिळू शकते.

0

Tata Harrier EV : सध्या ऑटो मार्केटमध्ये एसयूव्ही कारच्या वाढ झाल्याने टाटा मोटर्सकडून त्यांच्या नवीन एसयूव्ही कार सादर केल्या जात आहेत. Nexon आणि Nexon EV फेसलिफ्ट्स या एसयूव्ही लॉन्च केल्यानंतर आता टाटा मोटर्स आणखी एक एसयूव्ही लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांची हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट या जबरदस्त एसयूव्ही कार या महिन्यात लॉन्च केल्या जाणार आहेत. कारचे बुकिंग देखील ६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. टाटा मोटर्स हॅरियर ईव्ही या एसयूव्हीवर देखील काम करत आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Harrier EV एसयूव्ही कारच्या चाचणी दरम्यान काही फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. ही कार पूर्णपणे कव्हर केले होती. मात्र कारचा लूक समोर आला आहे.

motoroctane

टाटा मोटर्सकडून त्यांच्या नवीन Harrier EV एसयूव्ही कारमध्ये नवीन डिझाइन, बोनेट-व्यापी DRL डिझाइन दिले जाऊ शकते. ही कार समान अलॉय व्हील आणि टेल लाईट डिझाइनसह सादर केली जाऊ शकते. कंपनीकडून चाचणी दरम्यान फ्लोटिंग इन्फोटेनमेंट आणि 4-स्पोक स्टीयरिंग व्हील सारखे मुख्य हायलाइट्स कव्हर केले होते.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Harrier EV ची चाचणी घेताना कोणतेही फीचर्स लीक होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. मात्र चाचणी दरम्यान कार पहिल्यांदाच स्पॉट झाली आहे.

Harrier EV मजबूत पॅकसह होणार लॉन्च

motoroctane

टाटा मोटर्सकडून त्यांची Harrier EV कार मजबूत बॅटरी पॅकसह सादर केली जाऊ शकते. Harrier EV एसयूव्ही कारमध्ये 60 ते 70kWh बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 550 किमी रेंज देण्यास सक्षम असेल. हॅरियर EV निश्चितपणे AWD सेटअपसह सादर केली जाऊ शकते.

टाटा हॅरियर EV – लॉन्च तारीख

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू लागल्याने अनेक कार उत्पादक कंपनीकडून इलेक्ट्रिक कार सादर केल्या जात आहेत. टाटा मोटर्सचे एमडी शैलेश चंद्रा यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की 2024 पर्यंत हॅरियर ईव्हीसह 4 नवीन ईव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

2024 च्या मध्यापर्यंत हॅरियर ईव्ही लॉन्च केली जाऊ शकते असे देखील शैलेश चंद्रा यांनी सांगितले आहे. कारची एक्स शोरूम किंमत 27 लाख आणि 35 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.