Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Motors : Tata Curvv SUV लवकरच होणार लॉन्च ! मात्र दोन नावामध्ये आहे ट्रेडमार्क, जाणून घ्या कंपनी काय घेणार निर्णय…

बाजारात मोटर्स बाजारात एक नवीन कार घेऊन येत आहे. मात्र या कारच्या ट्रेडमार्कवरून अजूनही गोंधळ निर्माण आहे.

0

Tata Motors : भारतीय बाजारात टाटा मोटर्स अनेक नवनवीन स्टायलिश कार लॉन्च करत असते. टाटा मोटर्स ही कंपनी सर्वाधिक सुरक्षित कार बनवणारी कंपनी म्ह्णून ओळखली जाते.

अशा वेळी टाटा मोटर्स एक नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अलीकडेच टाटा फ्रेस्ट आणि टाटा अझुरा ही नावे या कारसाठी ट्रेडमार्क केली आहेत. या दोन्हींमधील एक नाव Tata Curve च्या नेमप्लेटसाठी वापरले जाईल असा अंदाज आहे.

मात्र टाटाने आधीच स्पष्ट केले आहे की कर्व्हची इलेक्ट्रिक आवृत्ती 2024 च्या सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर त्याचे अंतर्गत इंजिन (ICE) आवृत्ती येईल. यात नवीन डिजिटल डिझाईन लँग्वेज असेल, ज्याची झलक नवीन Nexon आणि Nexon.EV मध्ये देखील दिसली आहे. हे दोन्ही 14 सप्टेंबर 2023 ला लॉन्च होणार असल्याने कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

अझुरा एसयूव्ही डिझाइन

टाटा कंपणी टाटा कर्व्ह लॉन्च वेळी टाटा अझुरा असे नाव दिले जाऊ शकते. त्यात कर्व्ह कन्सेप्ट डिझाइनचे बारकाईने पालन केले जाईल अशी अपेक्षा आहे. म्हणजेच डिझाइन मॉडेलचे जास्तीत जास्त घटक उत्पादन मॉडेलमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल.

या मॉडेलमध्ये स्क्वेअर व्हील कमानी, बॉडी क्लॅडिंग आणि मागील बाजूस स्लोपिंग रूफ असण्याची शक्यता आहे. तसेच इंटीरियरमध्ये एंगुलर एलिमेंट्स 3-लेयर डॅशबोर्ड डिझाइन असण्याची शक्यता आहे.

Azura SUV ची वैशिष्ट्ये

Azura SUV मध्ये फ्री-स्टँडिंग ड्युअल डिजिटल स्क्रीन (एक इन्फोटेनमेंट सिस्टम आणि एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी), ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, फ्लोटिंग सेंटर कन्सोल, सेंटर आर्मरेस्ट, लोगो यासारखी नवीन वैशिष्ट्ये मिळतात.

तसेच 2-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि रोटरी गियर दिले जातील. नवीन Tata Azura EV मध्ये ब्रँडचे Ziptron टेक्नॉलॉजी असेल. ज्यामुळे हे सुमारे 400-500 किमीची श्रेणी देऊ शकते.