Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon : Creta आणि Brezza ची बत्ती गुल ! नेक्सॉननं खाल्लं अख्खं मार्केट, मिळतात लँड रोव्हर सारखे फीचर्स

0

Tata Nexon : देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. अशातच अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर करत आहेत. त्यांच्या या एसयूव्ही कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कार सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. थोड्याच दिवसांत टाटा मोटर्सची Nexon एसयूव्ही कार देशातील नंबर वन कार बनली आहे.

टाटा मोटर्सकडून Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच कारमध्ये शक्तीशाली इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.

देशातील सर्वच कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नोव्हेंबर 2023 या महिन्यातील कार विक्री अहवाल सादर केला आहे. यामध्ये एसयूव्ही कार विक्रीत टाटा मोटर्सची Nexon कार नंबर वन बनली आहे.

नेक्सॉनची किती विक्री झाली?

टाटा मोटर्सकडून देखील त्यांच्या कार विक्रीचे अहवाल सादर केले आहेत. नेक्सॉनची नोव्हेंबर 2023 मध्ये 14,916 युनिट्सची विक्री झाली आहे तर गेल्या वर्षी याच नोव्हेंबर 2022 मध्ये 15,871 युनिट्सची विक्री केली होती.

नेक्सॉन फेसलिफ्ट मॉडेलला प्रचंड मागणी

टाटा मोटर्सने नेक्सॉन फेसलिफ्ट मॉडेल सादर केल्यानंतर कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या कारला ग्लोबल NCAP चाचणीमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. टाटा मोटर्सची ही एक परवडणारी लँड रोव्हर कार आहे.

नेक्सॉन फेसलिफ्ट इंजिन

टाटा मोटर्सकडून त्यांच्या नेक्सॉन फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे जे 120 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन देखील दिले आहे जे 115 bhp पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

नेक्सॉन फेसलिफ्ट वैशिष्ट्ये

नेक्सॉन फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, 10.25 इंच फुल डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटो एसी, वायरलेस फोन चार्जिंग, हवेशीर आणि उंची समायोजित करण्यायोग्य फ्रंट सीट्स, क्रूझ कंट्रोल आणि पॅडल शिफ्टर्स असे फीचर्स दिले आहेत.

नेक्सॉन फेसलिफ्ट किंमत

टाटा मोटर्सकडून नेक्सॉन फेसलिफ्ट कारची किंमत वाढवली आहे. कारच्या जुन्या मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.10 लाख रुपये होती. मात्र आता नेक्सॉन फेसलिफ्ट एसयूव्ही कारची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपयांपासून सुरु होते. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.50 लाख रुपये आहे.