Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon.ev Facelift : Nexon.ev फेसलिफ्ट बुक केल्यांनतर किती दिवसांची करावी लागेल प्रतीक्षा, पहा किमतीसह सर्वकाही…

टाटा मोटर्सने त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कार Nexon.ev चे फेसलिफ्ट मॉडेल अलीकडेच सादर केले आहे. या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

0

Tata Nexon.ev Facelift : टाटा मोटर्सकडून अलीकडेच त्यांची Nexon.ev फेसलिफ्ट आणि Nexon फेसलिफ्ट कार लॉन्च केली आहे. या कारमध्ये डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच कारच्या किमतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.

टाटा मोटर्सकडून नवीन Nexon.ev Facelift कार 14.79 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीमध्ये सादर केली आहे. तर Nexon.ev Facelift च्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.94 लाख रुपयांपर्यंत जाते.

तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल तर त्याआधी ही कार बुकिंग करावी लागेल. कार बुकिंग करण्यासाठी तुम्हाला 21 हजार रुपयांच्या टोकन रकमेवर ती बुक करावी लागेल. बुकिंग केल्यानंतर काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल.

2023 Tata Nexon.ev फेसलिफ्ट

तुम्हालाही टाटा Nexon.ev फेसलिफ्ट कार खरेदी करायची असेल तर बुकिंग केल्यापासून आठ आठवड्यांपर्यंत या कारसाठी प्रतीक्षा करावी लागेल. बुकिंग कालावधी रंग, डिलरशिप आणि व्हेरियंटनुसार बदलू शकतो.

2023 Tata Nexon EV फेसलिफ्ट बॅटरी

टाटा मोटर्सकडून नवीन Nexon EV फेसलिफ्ट कारमध्ये सेकंड जनरेशन मोटर बसण्यात आली आहे. त्यामुळे कार आणखी शक्तिशाली झाली आहे. कारमध्ये नवीन मोटार बसवण्यात आल्याने कारची पॉवर 12 हजार RPM वरून 16 हजार RPM पर्यंत वाढली आहे. 106.4 kW बॅटरी पॅकमध्ये बसवण्यात आलेली मोटर 142.6 bhp पॉवर जनरेट करते.

2023 टाटा नेक्सॉन EV फेसलिफ्ट गती

नेक्सॉन EV फेसलिफ्ट एसयूव्ही कार ताशी 0 ते 100 किमी आहे. जे 8.9 सेकंदात पार करू शकते. कारचा टॉप स्पीड ताशी 150 किमी आहे. नेक्सॉन EV फेसलिफ्ट कारची बॅटरी चार्जिंग होण्यासाठी 56 मिनिटाचा कालावधी लागतो.

2023 Tata Nexon EV फेसलिफ्ट वैशिष्ट्ये

Nexon EV फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड-व्ह्यू मॉनिटर, हिल डिसेंट कंट्रोल, हिल एसेंट कंट्रोल, पॅनिक ब्रेक अलर्ट, ऑटो व्हेईकल होल्ड आणि आय-टीपीएमएस, 320-वॅट हरमन-सोर्स्ड जेबीएल साउंड सिस्टीम, पाच स्पीकर्स, द. नवीन डिजिटल कन्सोल अशी प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

तसेच एक्सप्रेस कुलिंग, ऑटो डिफॉगर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 6 एअरबॅग्ज, ISOFIX अँकरेज, ABS आणि ESP, फ्रंट आणि रियर सेन्सर्ससह 360-डिग्री कॅमेरा, सीटबेल्ट रिमाइंडर आणि फ्रंट पार्किंग असिस्ट अशी मानक सुरक्षा वैशिष्ट्ये देखील दिली आहेत.