Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon EV Facelift : फक्त 56 मिनिटांत फुल चार्ज होणारी Nexon EV फेसलिफ्ट किती किमी धावणार? पहा नवीन फीचर्स

टाटा मोटर्सची सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही कार Nexon EV फेसलिफ्ट कार सप्टेंबर महिन्यात भारतीय ऑटो बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत.

0

Tata Nexon EV Facelift : टाटाकडून त्यांची लोकप्रिय कार Nexon EV फेसलिफ्टचे अनावरण केले आहे. लवकरच ही कार भारतीय ऑटो बाजारात एन्ट्री करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कारचा पर्याय बाजारात उपलब्ध होणार आहे.

टाटाकडून त्यांची Nexon EV फेसलिफ्ट ही कार अपडेटेड फीचर्ससह 14 सप्टेंबर रोजी लॉन्च केली जाणार आहे. तसेच या कारसोबतच टाटा Nexon फेसलिफ्ट देखील रोजी लॉन्च केली जाणार आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Nexon EV फेसलिफ्ट कारमध्ये अनेक बदल केले आहेत. आजपासून या कारचे बुकिंग सुरू होणार आहे. तुम्हीही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फक्त २१ हजार रुपयांमध्ये तुम्ही ही कार खरेदी करू शकता.

Tata Nexon EV फेसलिफ्ट बॅटरी पॅक आणि रेंज

टाटा नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्टमध्ये पूर्वीसारखाच बॅटरी पॅक दिला जाणार आहे. सध्या या कारमध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय दिले जात आहेत. पहिला 30kWh बॅटरी जी 325 किमीची रेंज देते आणि दुसरा बॅटरी पॅक 40.5kWh दिला जात आहे. हा बॅटरी पॅक 465 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. फास्ट चार्जरने 56 मिनिटांत ही कार पूर्णपणे चार्ज होईल.

वैशिष्ट्ये

नवीन टाटा Nexon EV फेसलिफ्ट 6 एअरबॅग, ISOFIX अँकरेज, ABS आणि ESP अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. मागील सेन्सर्ससह 360-डिग्री कॅमेरा, सीटबेल्ट रिमाइंडर आणि समोर पार्किंग, 10.25 इंच इन्फोमेन्ट टचस्क्रीन सिस्टीम देण्यात आली आहे.

Nexon EV इंटिरियर

टाटा Nexon EV फेसलिफ्टमध्ये नवीन डॅशबोर्ड देण्यात आला आहे. कारमध्ये 10.25-इंचाच्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आला आहे. हीटिंग, वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग नियंत्रणे देखील नवीन व्हर्जनमध्ये देण्यात आले आहे.

तसेच कारमध्ये बिल्ट-इन डॅशकॅम, कनेक्टेड कार टेक, ओव्हर-द-एअर अपडेट्स, वायरलेस चार्जिंग, वायरलेस ऍपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, एअर प्युरिफायर, सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, 9 स्पीकर जेबीएल साउंड सिस्टम, एसी फ्रंट सीट्स देण्यात आले आहेत.