Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon Facelift 2023 : टाटा नेक्सॉनमध्ये काय झाले बदल? पहा नवीन इंजिन, वैशिष्ट्ये आणि किंमत…

टाटा मोटर्सकडून Nexon कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. जुन्या Nexon कारपेक्षा नवीन कारमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत.

0

Tata Nexon Facelift 2023 : टाटा मोटर्सकडून त्यांची सर्वाधिक विक्री होणारी लोकप्रिय एसयूव्ही नेक्सॉनचे नवीन मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. या कारमध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. कंपनीकडून आज कारच्या किमती देखील जाहीर केल्या आहेत.

टाटा नेक्सॉन Facelift एसयूव्ही कारमध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. तसेच इंजिनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. नवीन डिझाईनसह आज १४ सप्टेंबर रोजी ही कार लॉन्च करण्यात आली आहे. जुन्या नेक्सॉन कारपेक्षा ही नवीन नेक्सॉनमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत.

नेक्सॉन Facelift डिझाईन

टाटा मोटर्सकडून नेक्सॉन Facelift कारच्या डिझाईनमध्ये देखील बदल केला आहे. कंपनीकडून ही कार अधिक स्पोर्टी लुकसह लॉन्च केली आहे. कारच्या फ्रंट एंडमध्ये स्प्लिट हेडलॅम्प सेटअप देण्यात आला आहे. कारमध्ये नवीन 16 इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे कार अधिक आकर्षक दिसत आहे.

 इंटेरियर

नेक्सॉन Facelift कारच्या केबिनमध्ये देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. नव्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसोबतच इंटिरिअरलाही नवा लुक देण्यात आला आहे. कारमध्ये स्टीयरिंग व्हील, टच कंट्रोल नवीन डॅशबोर्ड देण्यात आला आहे. तसेच 10.25 इंचाची मोठी टच स्क्रीन देण्यात आली आहे.

नेक्सॉन Facelift वैशिष्ट्ये

टाटा नेक्सॉन Facelift कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, 6 एअरबॅग्ज, 9 स्पीकरसह JBL ऑडिओ सिस्टीम, इलेक्ट्रिक सनरूफ अशी नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

नेक्सॉन Facelift इंजिन

टाटा मोटर्सकडून नेक्सॉन Facelift एसयूव्ही कारमध्ये टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. कारच्या टर्बो पेट्रोल इंजिनला पॅडल शिफ्टर्ससह 7 स्पीड डीसीटी पर्याय जोडण्यात आला आहे.

नेक्सॉन Facelift किंमत

टाटा मोटर्सच्या Nexon Facelift एसयूव्ही कारची एक्स शोरूम किंमत 08.09 लाख रुपये आहे. तर Nexon Facelift च्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.99 लाख रुपये आहे. टाटा Nexon Facelift EV ची एक्स शोरूम किंमत 14.74 लाख रुपये आहे.