Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon Facelift : 6 एअरबॅग्जसह लॉन्च झालेल्या नेक्सॉन फेसलिफ्टबद्दल जाणून घ्या 5 महत्वाच्या गोष्टी, किंमत 8 लाखांपासून सुरु

टाटा मोटर्सकडून त्यांची नवीन Nexon Facelift कार अलीकडेच भारतीय ऑटो बाजारात दाखल केली आहे. ही कार 8 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीमध्ये सादर करण्यात आली आहे.

0

Tata Nexon Facelift : टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कार Nexon Facelift नुकतीच लॉन्च केली आहे. Nexon फेसलिफ्ट कारमध्ये अनेक नवी फीचर्स जोडण्यात आले आहेत. जुन्या Nexon पेक्षा आता नवीन Nexon फेसलिफ्ट अधिक प्रीमियम एसयूव्ही कार बनली आहे.

तुम्हीही Nexon फेसलिफ्ट कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या कारमध्ये काय बदल करण्यात आले आहेत? तसेच कारच्या किमतीबद्दल आणि इतर फीचर्स जाणून घेणे गरजेचे आहे.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट किंमत

टाटा मोटर्सकडून त्यांची Nexon फेसलिफ्ट कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे. Nexon फेसलिफ्ट AMT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 11.70 लाख रुपये आहे. DCA व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 12.20 लाख रुपये आहे.

टाटा Nexon फेसलिफ्ट डिझेल वेरिएंटच्या सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 11 लाख रुपये आहे तर डिझेल AMT गिअरबॉक्स असलेल्या Nexon फेसलिफ्टची एक्स शोरूम किंमत 13.00 लाखांपर्यंत जाते.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट डिझाइन

टाटा मोटर्सकडून नवीन नेक्सॉन फेसलिफ्टचे डिझाइन बदलण्यात आले आहे. हे डिझाईन कर्व्ह संकल्पनेतून घेतले आहे. नवीन स्प्लिट हेडलॅम्प, पुढील आणि मागील लाईट बार आणि फास्ट लाईन लाइट देण्यात आले आहेत. तसेच कारचा डॅशबोर्ड पूर्णपणे बदलण्यात आला आहे.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट इंजिन

टाटा मोटर्सकडून जुन्या नेक्सॉन कारमध्ये देण्यात येणारेच इंजिन पर्याय नव्या नेक्सॉनमध्ये देण्यात आले आहेत. या कारमध्ये 1.2-लिटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 120 bhp पॉवर आणि 170 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. पेट्रोल इंजिनला तीन ट्रान्समिशन पर्याय देण्यात आले आहेत. पहिला 6-स्पीड मॅन्युअल, दुसरा 6-स्पीड AMT आणि तिसरा 7-स्पीड DCT गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

दुसरे इंजिन 1.5-लिटर टर्बोचार्ज केलेले डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 114 bhp पॉवर आणि 260 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट वैशिष्ट्ये

टाटा नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. नवीन कारमध्ये 10.25-इंच मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच मोठे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री सराउंड-व्ह्यू कॅमेरा, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड सीट्स आणि एअर प्युरिफायर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट सुरक्षा वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सकडून नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये सर्वाधिक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), ABS, EBD, ISOFIX चाइल्ड सीट अँकरिंग पॉइंट, पार्किंग सेन्सर, आपत्कालीन आणि ब्रेकडाउन अशी मानक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.