Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon Facelift : 8 लाखांची लँड रोव्हर ठरली नंबर वन! 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह मिळतात 6 एअरबॅग्स

तुम्हालाही लँड रोव्हर एसयूव्ही कारचा कमी बजेटमध्ये आनंद घेईचा असेल तर टाटा मोटर्सने अगदी ८ लाखांच्या किमतीमध्ये त्यांची उत्तम एसयूव्ही कार सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

0

Tata Nexon Facelift : देशात रस्ते अपघाताची संख्या दररोज वाढतच चालली आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या कारमध्ये सर्वाधिक सुरक्षा फीचर्स देण्याचा प्रयत्न करत आहेत. टाटा मोटर्सकडून त्यांच्या सर्वच कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

देशात टाटा मोटर्सच्या कार सर्वाधिक सुरक्षित कार म्हणून ओळखल्या जात आहेत. टाटाच्या अनेक कारला ५ स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे. गेल्या महिन्यात टाटा मोटर्सची कमी बजेट लँड रोव्हर Nexon एसयूव्ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही कार ठरली आहे. तर सर्वाधिक कार विक्रीमध्ये Wagnor आणि स्विफ्टनंतर Nexon फेसलिफ्टने स्थान मिळवले आहे.

ऑक्टोबर २०२३ या महिन्यातील Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कार विक्रीचा अहवाल समोर आला आहे. या महिन्यात Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारची एकूण 16,887 युनिट्सची विक्री झाली आहे तर सप्टेंबर २०२३ या महिन्यात 15,300 युनिट्सची विक्री झाली होती.

एसयूव्ही कारच्या विक्रीमध्ये Nexon नंबर वन कार ठरली आहे. टाटा मोटर्सने Nexon कारचे फेसलिफ्ट मॉडेल अलीकडेच सादर केले आहे. या कारच्या डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत अनेक बदल केले आहेत.

Nexon फेसलिफ्ट किंमत

टाटा मोटर्सने त्यांच्या Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. तसेच कारची किंमत देखील कमी ठेवली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.50 लाख रुपये आहे. ग्लोबल NCAP चाचणीमध्ये या कारला 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

Nexon फेसलिफ्ट इंजिन

टाटा मोटर्सने त्यांच्या Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे जे 120 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे..तसेच कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन देखील दिले आहे जे 115 bhp पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

पेट्रोल इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड एएमटी गिअरबॉक्स पर्याय आणि नवीन 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन पर्याय देखील देण्यात आला आहे. तर डिझेल इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड एएमटीचा पर्याय देण्यात येत आहे. ही कार Honda Elevate, Kia Sonet, Hyundai Venue आणि Maruti Brezza एसयूव्ही कारशी स्पर्धा करते.