Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon Facelift : अवघ्या 1 लाखांत घरी आणा टाटाची 5 स्टार सेफ्टी असलेली Nexon फेसलिफ्ट, पहा कसे ते

0

Tata Nexon Facelift : प्रत्येकाचे कार खरेदीचे स्वप्न असते. मात्र वाढत्या महागाईमुळे कारच्या किमतीत देखील प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना कार खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता अवघ्या एक लाखांत तुम्ही उत्तम कार घरी आणू शकता.

तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्ही नवीन एसयूव्ही खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण तुम्ही अवघ्या 1 लाखांत टाटा मोटर्सची सर्वोत्तम Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कार घरी आणू शकता.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आठ लाखांची Nexon अवघ्या 1 लाखांत कशी खरेदी करायची? तुम्हाला बँकेकडून Nexon एसयूव्ही कारवर EMI पर्याय देण्यात येत आहे. त्यामुळे 1 लाख रुपयांचे डाऊनपेमेंट भरून Nexon कार घरी आणू शकता.

Nexon फेसलिफ्ट सुरक्षा फीचर्स

Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारला ग्लोबल NCAP चाचणीमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. तसेच कारमध्ये 6 एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा, रियर पार्किंग सेन्सर, ABS, EBD, चाइल्ड लॉक, ISOFIX चाइल्ड सीटसह अनेक मानक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

तसेच कारमध्ये 10.25 इंच इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, क्लायमेट कंट्रोल एसी, रियर एसी व्हेंट्स, वायरलेस चार्जिंग अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी Nexon एसयूव्ही कार सर्वोत्तम आहे.

Nexon फेसलिफ्ट इंजिन

Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.2 लीटर रेव्हट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 113 BHP पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन 118 BHP पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे.

अवघ्या 1 लाख रुपयांचे डाऊनपेमेंटवर कशी आणायची Nexon

टाटा मोटर्सची Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कार 1 लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटवर घरी आणू शकता. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 809,990 रुपये आहे. तर याच कारची ऑन रोड किंमत 9,09,253 रुपये आहे.

जर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला 8,09,253 रुपयांचे कर्ज बँकेकडून दिले जाईल. हे कर्ज 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी दिले जाईल.

कर्जाची परतफेड करण्यासाठी दरमहा 13,020 रुपये EMI भरावा लागेल. 7 वर्षांत एकूण 10,93,691 रुपये द्यावे लागतील. कर्जावर तुमच्याकडून सात वर्षात 2,84,438 रुपये व्याज आकारले जाईल.