Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon Facelift : ह्युंदाई Venue खरेदी करताय? जरा थांबा… Nexon फेसलिफ्ट आहे तुमच्यासाठी सर्वोत्तम सुरक्षित कार, 6 एअरबॅग्ससह मिळतात प्रीमियम फीचर्स…

तुम्हीही नवीन कार खरेदी करताना ह्युंदाई Venue एसयूव्ही कारचा पर्याय निवडला असेल तर जरा थांबा. कारण त्याच किमतीमध्ये तुम्ही टाटा Nexon फेसलिफ्ट ही सर्वाधिक सुरक्षित कार खरेदी करू शकता.

0

Tata Nexon Facelift : भारतीय ऑटो बाजारात टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक कार सादर केल्या आहेत. त्यांच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटा मोटर्सकडून नेहमीच सुरक्षित कार तयार करण्यावर अधिक भर दिला आहे. सुरक्षित कार म्हणून टाटा मोटर्सच्या कारकडे पाहिले जाते.

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांच्या Nexon या लोकप्रिय एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात सादर केले आहे. या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच कारचे डिझाईन देखील बदलण्यात आले आहे.

टाटा मोटर्स आणखी शानदार एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. यामध्ये काही इलेक्ट्रिक कारचा देखील समावेश आहे. ऑक्टोबर २०२३ च्या शेवटी टाटा मोटर्स त्यांच्या सफारी आणि हॅरियर फेसलिफ्ट एसयूव्ही कार सादर करणार आहे. या कारचे डिझाईन आणि फीचर्स बदलण्यात आले आहे.

ह्युंदाई Venue आणि टाटा Nexon या दोन्ही एसयूव्ही कारमध्ये तगडी स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे. ह्युंदाईने देखील Venue कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. ऑगस्ट 2023 मध्ये, Nexon ची विक्री Venue आणि Brezza पेक्षा कमी होती. या महिन्यात Nexon चे फक्त 8,049 युनिट्स विकले गेले. त्या तुलनेत व्हेन्यूने 10,948 युनिट्स आणि ब्रेझाने 14,572 युनिट्सची विक्री केली.

Nexon फेसलिफ्ट मॉडेल

टाटा मोटर्सने त्यांच्या Nexon कारमध्ये नवीन डिझाईन आणि फीचर्स जोडण्यात आले आहे आणि पुन्हा एकदा ही कार भर्तरीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ही कार टॉप १० कारच्या विक्री यादीतून बाहेर पाडल्यानंतर आता पुन्हा एकदा ही कार सर्वाधिक विक्रीतील तिसऱ्या नंबरची कार बनली आहे.

सप्टेंबरमध्ये या कारची 15,325 युनिट्सची विक्री झाली आहे. ह्युंदाई Venue कारची 12,204 युनिट्स आणि ब्रेझाच्या 15,001 युनिट्सची विक्री झाली आहे. त्यामुळे टाटाच्या नवीन Nexon कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Nexon फेसलिफ्ट कशी आहे?

Nexon फेसलिफ्ट कारच्या डिझाईन आणि फीचर्समध्ये बदल करण्यात आला आहे. या कारमध्ये नवीन डिझाइन केलेल्या स्प्लिट एलईडी हेडलाइट सेटअप देण्यात आला आहे.

नवीन फ्रंट आणि बॅक बंपरसह नवीन एलईडी टेल लाइट सेटअपचा कारमध्ये समावेश करण्यात आला आहे. कारचा डॅशबोर्ड पूर्णपणे बदलण्यात आला आहे. 2 स्पोक स्टीयरिंग व्हील आणि नवीन कर्षक अलॉय व्हील्स कारमध्ये देण्यात आले आहेत.

किंमत वाढली

टाटा मोटर्सच्या जुन्या Nexon कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.10 लाख रुपयांपासून सुरू होईची मात्र आता नवीन Nexon फेसलिफ्ट कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपयांपासून सुरु होत आहे. त्यामुळे कारच्या किमतीमध्ये टाटाने १ लाख रुपयांची वाढ केली आहे.

Nexon फेसलिफ्ट इंजिन

टाटा मोटर्सकडून Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल असे दोन इंजिन पर्याय दिले आहेत. पहिला 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे 120 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते आणि दुसरे 1.5-लिटर डिझेल इंजिन जे 115 bhp पॉवर आणि 260 Nm टॉर्क टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.