Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon Facelift : कार खरेदीची सुवर्णसंधी! अवघ्या 2.50 लाखांमध्ये घरी आणा Nexon फेसलिफ्ट, पहा फीचर्स

टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कार Nexon फेसलिफ्ट कार गेल्या काही दिवसांपूर्वी लॉन्च केली आहे. या कारची किंमत जास्त असली तरी तुम्ही अवघ्या 2.50 लाखांमध्ये Nexon फेसलिफ्ट खरेदी करू शकता.

0

Tata Nexon Facelift : टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक कार अपडेटेड फीचर्ससह पुन्हा एकदा नव्याने लॉन्च केल्या जात आहेत. टाटा मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही कार Nexon फेसलिफ्ट अलीकडेच लॉन्च करण्यात आली आहे. या कारची किंमत देखील कमी ठेवण्यात आली आहे.

तुम्हालाही टाटा मोटर्सची Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही खरेदी करायची असेल आणि बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही अगदी 2.50 लाखांमध्ये Nexon फेसलिफ्ट कार खरेदी करण्याची संधी आहे.

टाटा Nexon फेसलिफ्ट कार 8.09 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. मात्र तुम्हाला इतके पैसे भरण्याची गरज नाही. तुम्ही फक्त 2.50 लाख रुपयांचे डाउनपेमेंट भरून ही कार खरेदी करू शकता.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट EMI, कर्ज

तुमच्याकडे Nexon फेसलिफ्ट कार खरेदीसाठी इतके पैसे नसतील टेन्शन घेऊ नका. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.09 लाख रुपये आहे. 64,699 रुपये आरटीओ चार्ज, विमा, कर आणि फास्टॅगसह इतर शुल्क सुमारे 43,833 रुपये असे मिळून तुम्हाला एकूण 9,24,522 रुपये भरावे लागतील.

पण बजेट कमी असेल तर 2,50,000 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 6,74,522 रुपये कर्ज घ्यावे लागेल. हे कर्ज तुम्हाला वार्षिक ९ टक्के व्याजदराने दिले जाईल. हे कर्ज तुम्हाला ५ वर्षांसाठी दिले जाईल. कर्जाची परतफेड करण्यासाठी दरमहा 14,001 EMI भरावा लागेल.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट एक्सटीरियर

टाटा मोटर्सने त्यांच्या Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारचा डॅशबोर्ड पूर्णपणे बदलला आहे. हेडलाइट्सच्या खाली एक मोठी ग्रिल देखील पाहायला मिळत आहे. कर्व्ह संकल्पना नवीन टच स्क्रीन सेट-अप आणि दोन-स्पोक स्टीयरिंग व्हीलसह ही कार सादर करण्यात आली आहे. तसेच नवीन अलॉय व्हील्स देखील देण्यात आली आहेत.

टाटा नेक्सॉन वैशिष्ट्ये

नेक्सॉन फेसलिफ्ट कारमध्ये एअर प्युरिफायर, 6 एअरबॅग्ज, ESC, सर्व सीटसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट, ISOFIX तसेच आपत्कालीन आणि ब्रेकडाउन कॉल असिस्टंट, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच दुसरी स्क्रीन आहे. एक पूर्ण- डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील उपलब्ध आहे. 360-डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, वायरलेस चार्जर, एसी फ्रंट सीट्स अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट इंजिन

नेक्सॉन फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनला 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड एमटी आणि 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे.