Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon Facelift : शक्तिशाली इंजिन आणि 6 एअरबॅग्जसह येणाऱ्या Nexon च्या प्रतीक्षा कालावधीत वाढ! 8 लाखाची कार खरेदीपूर्वी पहा प्रतीक्षा कालावधी

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची Nexon फॅसिलिफ्ट कार लॉन्च केली आहे. मात्र या कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये वाढ झाली आहे. कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या प्रतीक्षा कालावधी.

0

Tata Nexon Facelift : टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय Nexon एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल अलीकडेच भारतीय ऑटो बाजारात लॉन्च केले आहे. या कारमध्ये डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स जोडण्यात आले आहेत.

टाटा मोटर्सकडून 14 सप्टेंबर 2023 रोजी देशात Nexon फॅसिलीफ्ट एसयूव्ही कार लॉन्च केली आहे. ही कार लॉन्च होऊन आता एक महिना झाला आहे. या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तुम्हीही टाटा मोटर्सची Nexon फेसलिफ्ट कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कार खरेदीसाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. या ५ सीटर एसयूव्ही कारच्या विक्रीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Nexon फेसलिफ्टवर 6 ते 8 आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी

टाटा मोटर्सने Nexon फेसलिफ्ट कारमध्ये अनेक शानदार फीचर्स दिले असल्याने कार खरेदीदारांची संख्या वाढली आहे. जर तुम्ही Nexon फेसलिफ्ट कार खरेदी करण्यासाठी आज बुकिंग केले तर तुम्हाला ही कार खरेदीसाठी ६ ते ८ आठवड्यांचा प्रतीक्षा करावी लागू शकते. हा प्रतीक्षा कालावधी डिलरशिप, रंग आणि व्हेरियंटनुसार बदलू शकतो. अधिक माहिती हवी असल्यास जवळच्या डिलरशिपला भेट देऊन मिळवू शकता.

Nexon फेसलिफ्ट इंजिन पॉवरट्रेन

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Nexon फेसलिफ्ट कामध्ये दोन इंजिन पर्याय दिले आहेत. 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन असे पर्याय उप्लद्भ आहेत. पेट्रोल इंजिन 118bhp पॉवर आणि 170Nm पीक टॉर्क जनरेट करते. तर डिझेल इंजिन 113bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Nexon फेसलिफ्ट किंमत

टाटा मोटर्सकडून जुन्या Nexon एसयूव्ही कारपेक्षा Nexon फेसलिफ्ट कारच्या किमतीमध्ये तब्बल १ लाख रुपयांची वाढ केली आहे. Nexon फेसलिफ्ट कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.50 लाख रुपये आहे.

Nexon फेसलिफ्ट वैशिष्ट्ये

Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, हवेशीर जागा, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स, 360 डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, 6 एअरबॅग्ज अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.