Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon Facelift : टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट देते आश्चर्यकारक मायलेज, पहा शक्तिशाली इंजिन आणि फीचर्स

टाटा मोटर्सकडून त्यांची नेक्सॉन फेसलिफ्ट कार अलीकडेच लॉन्च केली आहे. कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ही कार आश्चर्यकारक मायलेज देत आहे.

0

Tata Nexon Facelift : टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कार नेक्सॉन फेसलिफ्ट अलीकडेच लॉन्च केली आहे. टाटा मोटर्सची नेक्सॉन एसयूव्ही कार सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. आता या कारचे नवीन मॉडेल सादर करण्यात आले आहे.

तसेच कंपनीकडून कारचे मायलेज देखील सादर करण्यात आले आहे. तुम्हीही टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा विचार योग्य आहे. ही कार अगदी कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे.

पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये ही कार लॉन्च

टाटा मोटर्सकडून नेक्सॉन फेसलिफ्ट कारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Nexon 4 पेट्रोल पॉवरट्रेन कॉम्बिनेशन आणि 2 डिझेल पॉवरट्रेन पर्यायांसह ऑफर करण्यात आली आहे.

1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मॅन्युअल पर्याय सर्वाधिक मायलेज देण्यास सक्षम आहे. तर पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल आणि पेट्रोल 7-स्पीड डीसीटी कमीत कमी मायलेज देण्यास सक्षम आहे. डिझेल व्हर्जनमध्ये ही कार 23.23 kmpl तर 24.08 kmpl मायलेज देते.

नेक्सॉन फेसलिफ्ट कारचे 1.5 टर्बो पेट्रोल इंजिन 17.07 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. कारचे 1.5 टर्बो पेट्रोल इंजिन जे 6 स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. हे व्हर्जन 17.44kmpl मायलेज देते.

2023 नेक्सॉन फेसलिफ्ट मायलेज
इंजिन पर्याय मायलेज
1.2L Turbo Petrol 5-speed MT17.01kmpl
1.2L Turbo Petrol 6-speed MT17.44kmpl
1.2L Turbo Petrol 6-speed AMT17.18kmpl
1.2L Turbo Petrol 7-speed DCT17.01kmpl
1.5L Turbo Diesel 6-speed MT23.23kmpl
1.5L Turbo Diesel 6-speed AMT24.08kmpl

 

नवीन Tata Nexon चे इंजिन स्पेसिफिकेशन

Nexon कारमध्ये 1.2L टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 5500rpm वर 120PS ची पॉवर आणि 1750rpm ते 4000rpm दरम्यान 170Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 4 ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड एएमटी आणि 7-स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील आहे.

टाटा Nexon कारमध्ये 1.5L टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 4000rpm वर 110PS पॉवर आणि 1500rpm ते 2750rpm दरम्यान 260Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. 1.5L टर्बो डिझेल इंजिनमध्ये दोन ट्रान्समिशन पर्याय आहेत, 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड AMT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे दोन पर्याय डिझेल इंजिनमध्ये देण्यात आले आहेत.