Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

टाटा नेक्सॉनची किंमत किती असणार ? एक चूक पडली महागात ! लॉन्च होण्याआधीच सोशल मीडियावर व्हायरल | Tata Nexon Facelift Price

0

Tata Nexon Facelift Price :- टाटा नेक्सॉन ही भारतातील एक लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेगमेंट एसयूव्ही आहे, टाटा ने 2017 मध्ये नेक्सॉन लाँच केली होती. आता कंपनी आपले सेकंड जनरेशन मॉडेल लॉन्च करणार आहे. देशात, टाटाच्या या कारची स्पर्धा Maruti Brezza, Kia Sonet,Mahindra XUV300,Hyundai Venue ह्या कार्स सोबत होते.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्टचा लूक सध्याच्या मॉडेलपेक्षा खूपच वेगळा आहे. नवीन नेक्सॉन आउटगोइंग मॉडेलपेक्षा अधिक मस्क्यूलर आहे आणि समोरील बाजूस एलईडी टर्न इंडिकेटरसह स्प्लिट एलईडी हेडलॅम्प जोडते. याशिवाय मागील बाजूस नवीन अलॉय व्हील्स आणि Y-पॅटर्न एलईडी टेल लॅम्प उपलब्ध आहेत. तसेच, नवीन बंपर आणि रिव्हर्स लॅम्प हाऊसिंगमध्ये उभे रिफ्लेक्टरसह सेट केले आहेत.

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आपली टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट 14 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच इंस्टाग्रामवर या वाहनाच्या किंमतीची माहिती लीक झाली आहे.

टाटा नेक्सॉन चे. ही कार 14 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे पण कंपनीने चुकून तिची किंमत आधीच लीक केली आहे.या कारच्या फेसलिफ्ट मॉडेलची किंमत 14 सप्टेंबर रोजी जाहीर होणार होती, परंतु एका वापरकर्त्याला उत्तर देताना टाटाने चुकून नेक्सॉन फेसलिफ्टची किंमत लीक केली. कंपनीने इन्स्टाग्रामवर tatanexonofficial हँडलसह उत्तर दिले की नवीन Nexon ची सुरुवातीची किंमत किती असेल ?

टाटा नेक्सॉनच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या किमतींची माहिती देण्यात आली आहे. मात्र, नंतर ती टिप्पणी हटवण्यात आली. ही कार मारुती ब्रेझापेक्षा स्वस्त असू शकते.नवीन टाटा नेक्सॉनमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच 2 पॉवरट्रेन पर्याय आहेत. यामध्ये उपलब्ध असलेले पहिले 1.2-लिटर पेट्रोल इंजिन 113bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

ट्रान्समिशनसाठी, ते शिफ्ट-बाय-वायर तंत्रज्ञानासह 6-स्पीड मॅन्युअल, एएमटी गिअरबॉक्स आणि 7-स्पीड डीसीटी युनिटसह जोडलेले आहे.
दुसरे म्हणजे, या वाहनात 1.5-लिटर डिझेल इंजिन (113bhp/260Nm) चा पर्याय देखील आहे. यामध्ये इको, सिटी आणि स्पोर्ट ड्राइव्ह मोड देखील उपलब्ध आहेत.

Tata Nexon फेसलिफ्टच्या केबिनमध्ये नवीन डॅशबोर्ड, सेंटर कन्सोल आणि लोगोसह नवीन 2-स्पोक मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील आहे.
याशिवाय, यात वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी आणि नवीन UI सह 10.25-इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25-इंच डिजिटल कन्सोल आहे.प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), 6 एअरबॅग्ज, पार्किंग सेन्सर्स, ADAS तंत्रज्ञान आणि क्रूझ कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये या वाहनात मिळू शकतात.

कंपनीने नंतर त्याची इन्स्टा पोस्ट हटविली परंतु तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉट इंटरनेटवर व्हायरल होऊ लागले. जर या पोस्टवर विश्वास ठेवला आणि ही किंमत योग्य मानली तर भारतीय बाजारपेठेतही किंमत युद्ध सुरू होऊ शकते. कारण, जेव्हा एखादी कंपनी तिचे कोणतेही मॉडेल अपडेट करते तेव्हा नवीन मॉडेलची किंमत सामान्यतः जुन्या आउटगोइंग मॉडेलपेक्षा जास्त असते.

या कारची किंमत काय असेल?
लीक झालेल्या फोटोनुसार, टाटा हे वाहन सुमारे 7.39 लाख रुपये लाँच करू शकते, तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 12.5 लाख रुपये असेल.