Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon Facelift : ब्रेझाला करा रामराम! खरेदी करा 6 एअरबॅग, 5-स्टार सेफ्टी आणि 8 लाख किंमत असलेली टाटाची डॅशिंग SUVs

तुम्हालाही तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर मारुती ब्रेझा नाही तर टाटाची नवीन एसयूव्ही कार सर्वोत्तम पर्याय आहे.

0

Tata Nexon Facelift : देशात एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. अशातच अनेक नवीन एसयूव्ही कार सादर केल्या जात आहेत. तुम्हीही नवीन एसयूव्ही कार खरेदीसाठी ब्रेझा एसयूव्ही कारचा पर्याय निवडला असेल तर जरा थांबा.

कारण मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्ही कारच्या किमतीमध्ये तुम्ही टाटाची डॅशिंग आणि सुरक्षित एसयूव्ही Nexon Facelift खरेदी करू शकता. सध्या ब्रेझा एसयूव्ही कार अधिक लोकप्रिय असली तरी तुमच्यासाठी टाटाची Nexon सर्वाधिक सुरक्षित एसयूव्ही कार आहे.

टाटा मोटर्सने Nexon कारचे फेसलिफ्ट मॉडेल सादर केल्यापासून ग्राहकांना चांगला प्रतिसाद या कारला मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात मारुतीची ब्रेझा एसयूव्ही कार नंबर वन एसयूव्ही कार ठरली होती. मात्र आता Nexon फेसलिफ्ट कारने ब्रेझा एसयूव्ही कारला विक्रीमध्ये मागे टाकले आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये, Brezza एसयूव्ही कारची 16,050 युनिट्स विकली गेली आहेत. Nexon फेसलिफ्ट कारची ऑक्टोबर 2023 मध्ये 16,887 युनिट्स विकली गेली आहेत. Nexon फेसलिफ्ट एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Nexon फेसलिफ्ट सुरक्षा वैशिष्ट्ये

Nexon फेसलिफ्ट कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आले आहे. कारमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि मानक म्हणून 360-डिग्री कॅमेरा अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Tata Nexon Facelift इंजिन

टाटा मोटर्सकडून टाटा Nexon Facelift एसयूव्ही कारमध्ये 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 120 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

तसेच कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन देखील देण्यात आले आहे जे 115 bhp पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार 25 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

टाटा Nexon Facelift किंमत आणि वैशिष्ट्ये

Nexon Facelift एसयूव्ही कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, क्रूझ कंट्रोल आणि पॅडल शिफ्टर्स अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.50 लाख रुपये आहे.