Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon Facelift : टाटाची सर्वाधिक खप होणारी नेक्सॉन अवतरणार नवीन रूपात! या दिवशी होणार लॉन्च, मिळणार ड्युअल-क्लच ट्रान्समिशन

टाटा मोटर्सकडून लवकरच त्यांची सर्वाधिक खप होणारी नेक्सॉन कार नवीन अवतारात लॉन्च केली जणार आहे. आता ग्राहकांना नेक्सॉन या SUV कारमध्ये अनेक नवीन फीचर्स मिळू शकतात.

0

Tata Nexon Facelift : टाटा मोटर्सच्या कारची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढायला लागली आहे. तसेच टाटा मोटर्स कंपनीच्या आकार सर्वाधिक सुरक्षित कार म्हणून देखील ओळखल्या जात आहेत. तसेच भारतीय ऑटो बाजारात या कंपनीच्या कारच्या मागणीत देखील वाढ झाली आहे.

टाटा मोटर्सकडून गेल्या काही वर्षांपूर्वी एक दमदार नेक्सॉन SUV लॉन्च करण्यात आली होती. या शक्तिशाली SUV कारला बाजारात प्रचंड मागणी आहे. तसेच आता कंपनीकडून हीच कार पुन्हा एकदा नवीन रूपात सादर केली जाणार आहे.

टाटा मोटर्सकडून लवकरच त्यांची Tata Nexon Facelift लॉन्च केली जाऊ शकते. कंपनीकडून या कारची चाचणी देखील सुरु असल्याचे सांगितले जात आहे. या कारमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे

टाटा नेक्सॉन Facelift मध्ये ड्युअल-क्लच ट्रान्समिशन (DCT) पाहायला मिळू शकते. तसेच कारच्या अनेक फीचर्समध्ये बदल देखील पाहायला मिळू शकतात. त्यामुळे टाटाची लोकप्रिय नेक्सॉन SUV कार लवकरच भारतात सादर केली जाऊ शकते.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट टाइमलाइन

टाटा मोटर्सकडून त्यांच्या नेक्सॉन फेसलिफ्टची भारतीय रस्त्यांवर चाचणी सुरु आहे. या महिन्यामध्ये कंपनीकडून नेक्सॉन फेसलिफ्ट कार लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. ही कार नवीन बदलांसह पाहायला मिळू शकते.

इंटिरिअर बदलेल का?

नेक्सॉन फेसलिफ्टच्या इंटिरिअरमध्ये बदल पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. या कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाण्याची शक्यता आहे. कंपनीकडून 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट ही सिस्टीम हॅरियर आणि सफारी या दोन कारमध्ये देण्यात आली आहे.

त्याची बॉडी टाटा कर्वसारखी असण्याची शक्यता?

टाटा मोटर्सकडून नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात. या कारमध्ये नवीन एलईडी टेल लॅम्प आणि अपडेटेड बूट स्पेस दिले जाण्याची शक्यता आहे. या नवीन नेक्सॉन फेसलिफ्टची बॉडी Curvv कारसारखी असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेक्सॉन फेसलिफ्ट लूकमध्ये काय होणार बदल?

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट कारमध्ये डिझाईन बदल पाहायला मिळू शकते. पहिल्या नेक्सॉन कारच्या डिझाईनपेक्षा या नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये बदल पाहायला मिळेल. कारमध्ये नवीन बोनेट, हेडलॅम्प क्लस्टर आणि बंपर स्पोर्टियर मिळू शकते.