Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon Facelift : अवघ्या 8 लाखात मिळणार नवीन टाटा Nexon, कशी कराल बुक, जाणून घ्या सविस्तर

टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कार Nexon नवीन व्हर्जनमध्ये लॉन्च केली आहे. टाटा मोटर्सकडून या कारची किंमत देखील खूपच कमी ठेवण्यात आली आहे.

0

Tata Nexon Facelift : टाटा मोटर्सकडून नवीन Nexon फेसलिफ्ट कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. तसेच कारच्या डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. तसेच कंपनीकडून आज किमती देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही कार Nexon फेसलिफ्टचा लूकमध्ये बदल करण्यात आला आहे. नेक्सॉन फेसलिफ्ट कारमध्ये स्मार्ट, स्मार्ट+, स्मार्ट+ (एस), Pure, Pure+ (एस), क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह+, क्रिएटिव्ह+ (एस), Fearless, Fearless (एस) आणि Fearless+ (एस) अशी व्हेरियंट्स सादर करण्यात आली आहेत.

टाटा Nexon Facelift किंमत

टाटा मोटर्सकडून Nexon Facelift च्या किमती देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच या किमती व्हेरियंटनुसार वेगवेगळ्या आहेत. मात्र टाटा मोटर्सकडून अगदी ८ लाख या कारची किंमत ठेवली आहे.

Nexon Facelift स्मार्ट व्हेरियंट एक्स शोरूम किंमत 8.09 लाख रुपये
Nexon Facelift स्मार्ट + व्हेरियंट एक्स शोरूम किंमत 09.09 लाख रुपये
Nexon Facelift Pure व्हेरियंट एक्स शोरूम किंमत 09.69 लाख रुपये
Nexon Facelift Creative व्हेरियंट एक्स शोरूम किंमत 10.99 लाख रुपये
Nexon Facelift Creative + व्हेरियंट एक्स शोरूम किंमत 11.69 लाख रुपये
Nexon Facelift Fearless व्हेरियंट एक्स शोरूम किंमत 12.49 लाख रुपये
Nexon Facelift Fearless + व्हेरियंट एक्स शोरूम किंमत 12.99 लाख रुपये

Nexon Facelift इंजिन

टाटा मोटर्सकडून त्यांच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही Nexon Facelift मध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर डिझेल दिले आहे. पेट्रोल इंजिन 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल किंवा 7 स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह देण्यात आले आहे. तर डिझेल इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 6 स्पीड AMT सह देण्यात आले आहे.

Nexon Facelift फीचर्स

टाटा मोटर्सकडून Nexon Facelift एसयूव्ही कारमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. मल्टीफंक्शनल टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, फ्रंट एसी सीट्स, दोन्ही बाजूंना पार्किंग सेन्सर असलेला 360-डिग्री कॅमेरा, स्वयंचलित सनरूफ आणि एक मोठी 10.25-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे.

टाटा Nexon facelift कारमध्ये फिअरलेस पर्पल, क्रिएटिव्ह ओशन, प्रिस्टाइन व्हाइट, प्युअर ग्रे, डेटोना ग्रे आणि फ्लेम रेड असे रंग पर्याय ऑफर करण्यात करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग निवडू शकता.

टाटा Nexon Facelift कशी कराल बुक

तुम्हालाही टाटा मोटर्सची नवीन टाटा Nexon Facelift कार खरेदी करायची असेल तर तुम्ही त्याअगोदर ही कार बुकिंग करू शकता. तुमच्या जवळच्या टाटा मोटर्स डिलरशीमध्ये जाऊन ही कार बुकिंग करू शकता. तसेच घरबसल्या टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाईटद्वारे देखील तुम्ही ऑनलाईन ही कार बुकिंग करू शकता.

टाटा Nexon Facelift बुक करण्यासाठी येथे क्लिक करा.