Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Nexon Or Nexon EV Facelift : प्रतीक्षा संपणार! नवीन बदलांसह उद्या लॉन्च होणार Nexon आणि Nexon EV फेसलिफ्ट, जाणून घ्या किंमत

टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय कार Nexon उद्या पुन्हा एकदा नवीन अपडेट्ससह भारतीय ऑटो बाजारात लॉन्च केली जाणारा आहे. कारमध्ये अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळू शकतात.

0

Tata Nexon Or Nexon EV Facelift : टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षेत असलेली लोकप्रिय एसयूव्ही कार Nexon फेसलिफ्ट आणि Nexon EV फेसलिफ्ट उद्या भारतीय ऑटो बाजारात ग्रँड एन्ट्री करणार आहेत. या दोन्ही एसयूव्ही कारमध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या नवीन एसयूव्ही कारमध्ये जुन्या Nexon कारपेक्षा अनेक बदल केले आहेत. डिझाईनपासून कारमध्ये नवीन फीचर्सपर्यंत बदल करण्यात आले आहेत. या एसयूव्ही कारचा डॅशबोर्ड पूर्णपणे बदलण्यात आला आहे.

14 सप्टेंबर रोजी किंमत अधिकृतपणे जाहीर केली जाईल

टाटा मोटर्सकडून त्यांच्या 14 सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या लॉन्च होणाऱ्या Nexon फेसलिफ्ट आणि Nexon EV फेसलिफ्टच्या किमती देखील उद्याच जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे उद्या कार खरेदीदारांना आणखी नवीन एसयूव्ही कारचा पर्याय मिळणार आहे.

Nexon फेसलिफ्ट व्हेरियंट्स

टाटा मोटर्सकडून त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही कार Nexon फेसलिफ्टचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला आहे. कारच्या डिझाईनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. नेक्सॉन फेसलिफ्ट कारमध्ये स्मार्ट, स्मार्ट+, स्मार्ट+ (एस), Pure, Pure+ (एस), क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह+, क्रिएटिव्ह+ (एस), Fearless, Fearless (एस) आणि Fearless+ (एस) अशी व्हेरियंट्स सादर केली जाणार आहेत.

इंजिन

टाटा मोटर्सकडून कारच्या इंजिनमध्ये फारसा काही बदल केलेला नाही. नवीन कारमध्ये 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन देण्यात येत आहे. मात्र आता पेट्रोल इंजिनला 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल किंवा 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले असणार आहे. तसेच कारचे डिझेल इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 6-स्पीड AMT शी जोडलेले असणार आहे.

Nexon EV फेसलिफ्ट

टाटा मोटर्सकडून उद्या म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी Nexon EV फेसलिफ्ट देखील सादर केली जाणार आहे. कारच्या इंटेरियरमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. तसेच कारमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले जाणार आहेत. कारमध्ये पूर्णपणे एलईडी लाईट्स दिल्या जाणार आहेत.

इंटेरियर आणि एक्सटेरियर

टाटा Nexon फेसलिफ्ट कर्व्ह संकल्पनेवर आधारित असणार आहे. कॉम्पॅक्ट SUV मध्ये आता टर्न इंडिकेटर आणि लाइट बारसह स्प्लिट हेडलॅम्प सेटअप आहे आणि हेडलॅम्प बदलण्यात आले आहेत. कारमध्ये पूर्णपणे एलईडी लाईट्स जोडल्या जाणार आहेत. तसेच मोठी 10.25-इंच टचस्क्रीन आणि 10.25-इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात येणार आहे.

किंमत काय असू शकते

टाटा मोटर्सकडून त्यांच्या उद्या लॉन्च होणाऱ्या Nexon फेसलिफ्ट आणि Nexon EV फेसलिफ्टच्या किमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. मात्र उद्या या कारच्या किमती देखील जाहीर केल्या जाणार आहेत. Nexon फेसलिफ्टची किंमत 7.50 लाख रुपयांपासून ते 15 लाख रुपयांपर्यंत असू शकते. तर Nexon EV फेसलिफ्टची किंमत 15 लाख रुपयांपासून सुरू होऊन 20 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.