Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Punch 2024 : मायक्रो SUV Exter ला टक्कर देण्यासाठी टाटा मोटर्स सज्ज! लॉन्च करणार पंचचे नवीन मॉडेल, होणार हे मोठे बदल

टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही कार पंचचे नवीन मॉडेल लवकरच सादर केले जाणार आहे. कंपनीकडून पंच कारमध्ये अनेक बदल केले जाऊ शकतात.

0

Tata Punch 2024 : देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या मायक्रो एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या मायक्रो SUV लॉन्च करण्यावर अधिक भर देत आहेत. ह्युंदाई मोटर्सकडून अलीकडेच त्यांची Exter मायक्रो एसयूव्ही कार लॉन्च केली आहे.

मारुती सुझुकीकडून देखील त्यांची एस प्रेसो एसयूव्ही कार लॉन्च केली आहे. तर टाटा मोटर्सकडून त्यांची पंच कार लॉन्च केली आहे. मात्र आता टाटा मोटर्सकडून त्यांच्या पंच एसयूव्ही कारचे नवीन मॉडेल सादर केले जाणार आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या एसयूव्ही सेगमेंटमधील Exter एसयूव्ही लॉन्च करताच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दमदार मायलेज आणि कमी किमतीमुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.

मात्र आता ह्युंदाई Exter एसयूव्ही कारला टक्कर देण्यासाठी टाटा मोटर्सने कंबर कसली आहे. टाटा मोटर्स त्यांची पंच एसयूव्ही कार नवीन मॉडेलमध्ये लॉन्च करणार आहे. या कारमध्ये कंपनीकडून अनेक बदल केले जाऊ शकतात. टाटा मोटर्सकडून नवीन पंच कार २०२४ च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली जाऊ शकते. तसेच कंपनीकडून लवकरच या कारचे बुकिंग देखील सुरु केले जाणार आहे.

पंचमध्ये कोणते बदल पाहायला मिळतील?

टाटा पंच एसयूव्ही कारमध्ये अनेक बदल केले जाण्याची शक्यता आहे. पंच कारमध्ये मोठ्या आणि उत्तम सनरूफचा पर्याय दिला जाऊ शकतो. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारमध्ये 6 एअरबॅग्ज देण्यात येणार आहेत.

नवीन टाटा पंचला नवीन आणि मोठी इन्फोटेनमेंट सिस्टीम, नवीन स्टीयरिंग व्हील, क्लायमेट कंट्रोल एसी तसेच एसी फ्रंट सीट्स दिले जाऊ शकतात. टाटाकडून नवीन पोणच कारला आणखी स्पोर्टी लूक दिला जाऊ शकतो. तसेच कारला नवीन डिझाइन केलेले अलॉय व्हील्स दिले जातील.

शक्तिशाली इंजिन

टाटा पंच मॉडेलमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 25 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तसेच सध्या ही कार सीएनजी मॉडेलमध्ये देखील ऑफर करण्यात आली आहे. सीएनजीमध्ये ही कार 34 Kmpl मायलेज देते.

टाटा पंच कमी किंमत

टाटा पंच कारची सध्या बाजारातील बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपये आहे. सध्या ही कार एकूण 33 ट्रीममध्ये ऑफर करण्यात आली आहे.