Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Punch : 26.99 Kmpl मायलेज आणि किंमत फक्त 6 लाख! टाटाची ही कार विक्रीत ठरली सुपरहिट, पहा फीचर्स

टाटा मोटर्सकडून ऑगस्ट २०२३ मधील कार विक्री अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये टाटाच्या छोट्या एसयूव्ही कारने अव्वल स्थान मिळवले आहे.

0

Tata Punch : टाटा मोटर्सकडून त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. कमी बजेट ग्राहकांचा विचार करता आता टाटा मोटर्स १० लाख रुपयांच्या आतील किमतीत कार सादर करत आहे. टाटा मोटर्सची एक कार सर्वाधिक विक्रीमध्ये नंबर वन ठरली आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या पंच कारचे सीएनजी मॉडेल नुकतेच सादर केले आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. टाटा मोटर्सने ऑगस्ट २०२३ मध्ये एकूण 45,515 कार विक्री केल्या आहेत.

यामध्ये पंचची 14,523 युनिट्स विकली गेली आहेत तर गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये पंचची 12,006 युनिट्सची विक्री झाली होती. यावर्षी टियागोची 9463 युनिट्स विक्री झाली आहेत तर गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये 9463 युनिट्सची विक्री झाली होती.

Nexon च्या 8049 युनिट्सची विक्री

टाटा मोटर्सची लोकप्रिय कार Nexon ची विक्री कमी झाल्याचे दिसत आहे. Nexon कार विक्रीमध्ये तिसऱ्या नंबरवर आहे. या कारचे ऑगस्ट २०२३ मध्ये 8049 युनिट्स विकली गेली आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये Nexon ची 8049 युनिट्सची विक्री झाली होती.

टाटा पंच वैशिष्ट्ये आणि पॉवरट्रेन

टाटा मोटर्सकडून त्यांच्या पंच कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. तसेच ग्राहकांना अलीकडेच ही कार सीएनजी पर्यायांमध्ये देखील उपलब्ध करून दिली आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय या कारमध्ये उपलब्ध आहे. ही कार पेट्रोल व्हर्जनमध्ये 20.09 kmpl मायलेज देते तर CNG व्हर्जनमध्ये ही कार 26.99 किमी/किलो मायलेज देते.

366 लीटर बूट स्पेस

टाटा पंच ही कार लांब प्रवासासाठी अतिशय उत्तम कार आहे. या कारमध्ये 366 लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे. कारमध्ये सिंगल पॅनरूफची सुविधा देखील देण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपये आहे. तर टाटा पंच सीएनजी कारची एक्स शोरूम किंमत 7.10 लाख रुपये आहे.

टाटा पंचला 187 मिमी ग्राउंड क्लीयरन्स

टाटा पंच कारचे इंजिन 88 PS पॉवर आणि 115 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या कारला 187 मिमी ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. तसेच पंच कारमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. पॉवर विंडो, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज यांसारखे प्रगत फीचर्स देखील देण्यात आले आहरेत.