Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Punch CNG : टाटाच्या लोकप्रिय पंच CNG च्या मागणीत प्रचंड वाढ, खरेदीसाठी करावी लागणार इतकी प्रतीक्षा…

टाटा पंच खरेदीसाठी ग्राहकांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने आता पंच सीएनजी आणि पंच पेट्रोल या दोन्ही कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये वाढ झाली आहे.

0

Tata Punch CNG : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. अनेक ऑटो कंपन्यांनी त्यांची सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत.

टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार सेगमेंटमध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. टाटाच्या दोन्ही सेगमेंटमधील कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटाच्या पंच सीएनजी कारच्या मागणीमध्ये चांगली वाढ झाली आहे.

टाटाकडून त्यांची पंच सीएनजी कार सादर करताच ग्राहकांची ही कार खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र आता टाटाची पंच सीएनजी कार खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लग्नात आहे. टाटा मोटर्सकडून सर्वाधिक सुरक्षित कार सादर केल्या आहेत. सर्वाधिक सुरक्षित कार विकणारी टाटा मोटर्स सर्वात मोठी कंपनी आहे.

टाटा पंच सीएनजी आणि पेट्रोल

टाटा मोटर्सकडून त्यांची पंच कार आगोदर पेट्रोल व्हर्जनमध्ये सादर केली होती. तसेच नंतर सीएनजी कारच्या मागणीमध्ये वाढ पाहता पंच कार सीएनजी व्हर्जनमध्ये देखील अलीकडेच सादर करण्यात आली आहे. पंचच्या पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही व्हर्जनला प्रचंड मागणी आहे.

टाटा पंच सीएनजी आणि पेट्रोलची किंमत

टाटा मोटर्सकडून त्यांची पंच कार सीएनजी व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. या करच्या सीएनजी मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.10 लाख रुपयांपासून सुरु होते. Pure, Adventure, Adventure Rhythm, Accomplished आणि Accomplished Dazzle S अशी व्हेरियंट पंच सीएनजीमध्ये ऑफर कारण्यातबा आली आहेत. पंच कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत ६ लाख रुपये आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ९.५२ लाख रुपये आहे.

टाटा पंच सीएनजी आणि पेट्रोल प्रतीक्षा कालावधी

तुम्हीही टाटा पंच सीएनजी किंवा पेट्रोल कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हालाही कार खरेदीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. पंच सीएनजी कार खरेदी करण्यासाठी 12 आठवडे आणि पंच पेट्रोल कार खरेदीसाठी चार आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.