Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Punch EMI Plan : अवघ्या 1.20 लाखात घरी आणा टाटा पंच! दरमहा भरावे लागतील फक्त इतके पैसे

टाटा पंच कार खरेदी करण्याची चांगली संधी आहे. तुम्हीही पंच एसयूव्ही कार अवघ्या 1.20 लाखात घरी आणू शकता. कारमध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

0

Tata Punch EMI Plan : प्रत्येकाचे कार खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र कमी बजेटमुळे अनेकांना स्वतःच्या मालकीची कार खरेदी करता येत नाही. मात्र आता टाटा मोटर्सची पंच एसयूव्ही कार तुम्ही अवघ्या 1.20 लाखात घरी आणू शकता.

टाटा मोटर्सच्या पंचने ऑक्टोबर 2023 मध्ये 15,317 युनिट्सची विक्री केली आहे. त्यामुळे सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप १० कारमध्ये पंच कारचा सहावा नंबर आहे. या कारला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

टाटा पंचच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते. तर पंचच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10,09,900 रुपये आहे. पंच कारच्या किमतीच्या 20% रक्कम भरून कार घरी आणू शकता.

तुमचेही बजेट कमी असले आणि पंच कार खरेदी करायची असेल तर तुम्ही 1.20 लाख रुपयांचे डाउनपेमेंट भरून ही कार घरी आणू शकता. बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून तुम्हाला वार्षिक 8.65 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल.

पंच कारचे बेस मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 6 लाख रुपये लागू शकतात. कार खरेदी करण्यासाठी 1,19,980 रुपये भरल्यानांतर तुम्हाला 4,79,920 रुपये कर्ज घ्यावे लागेल.

या कर्जावर तुमच्याकडून 8.65% दराने 7 वर्षांसाठी कर्ज व्याज आकारले जाईल. कर्जाची परतफेड करण्यासाठी दरमहा EMI भरावा लागेल. ७ वर्षात या कर्जावर तुम्हाला 1,61,546 लाख रुपये व्याज द्यावे लागेल.

टाटा पंच इंजिन

टाटा पंच कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 88 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअलसह 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. पंच कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. पेट्रोल व्हेरियंट 20.09kmpl मायलेज देते तर सीएनजी व्हेरियंट 26.99 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

टाटा पंच वैशिष्ट्ये

पंच कारमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि क्रूझ कंट्रोल असे फीचर्स देण्यात आले आहे. कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर डिफॉगर, रिअर पार्किंग सेन्सर, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ISOFIX अँकर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.