Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Punch EV : पंच EV च्या किमती आणि व्हेरियंटचा तपशील लीक, पहा सध्याच्या पंचपेक्षा किती महाग असणार ईव्ही मॉडेल?

टाटा मोटर्सकडून त्यांची पंच EV एसयूव्ही कार लवकरच भारतात सादर केली जाणार आहे. ही कार लॉन्च होण्याअगोदरच कारची व्हेरियंट आणि किमतीचा तपशील लीक झाला आहे.

0

Tata Punch EV : देशातील ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन इलेक्ट्रिक कार सादर केल्या जात आहेत. टाटा मोटर्स लवकरच त्यांची आगामी Punch EV कार लॉन्च करणार आहे.

टाटा मोटर्सच्या अनेक कार इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. सध्या इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्सची पुढील इलेक्ट्रिक कार पंच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लॉन्च केली जाऊ शकते.

Nexon, Tiago आणि Tigor इलेक्ट्रिक कारनंतर आता पंच EV ही त्यांची चौथी स्वदेशी कार असणार आहे. टाटा पंच ईव्ही अनेकदा चाचणी दरम्यान रस्त्यावर दिसून आली आहे. टाटा मोटर्सच्या पंच ईव्हीह्या व्हेरियंट आणि किमतीचा काही अहवाल समोर आला आहे.

टाटा पंच EV वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सकडून त्यांच्या आगामी नवीन पंच EV एसयूव्ही कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येऊ शकतात. टाटा मोटर्स पंच EV 10.2-इंच किंवा 12.3-इंच इन्फोटेनमेंट सिस्टमसह ऑफर करू शकते. तसेच कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, 2-स्पोक स्टीयरिंग व्हील, पुन्हा डिझाइन केलेले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि बरेच नवीन वैशिष्ट्ये जोडली जाऊ शकतात.

पंच EV बॅटरी पॅक

टाटा मोटर्स पंच EV एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक देऊ शकते. नवीन एसयूव्ही पंच ईव्हीमधील बॅटरी पॅक Tiago EV सारखा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 24kWh बॅटरी पॅकसह 61bhp मोटर आणि 19.2kWh पॅकसह 24kWh बॅटरी पॅक कारमध्ये दिला जाण्याची शक्यता आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये ३०० किमीची रेंज देऊ शकते.

पंच EV व्हेरियंट आणि किंमत

VariantStarting price (Petrol AMT; ex-showroom)Starting price (EV trims; ex-showroom)Difference
Punch EV Adventure7.50 lakh12 lakh4.50 lakh
Punch EV Accomplished8.35 lakh12.85 lakh4.50 lakh
Punch EV Creative9.35 lakh13.85 lakh4.50 lakh
Punch EV Creative Flagship10.10 lakh14.60 lakh4.50 lakh