Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Punch EV Price : Punch EV च्या किमती लीक! पेट्रोल मॉडेलपेक्षा इतकी असणार महाग, पहा व्हेरियंटनुसार किंमत

टाटा मोटर्सकडून लवकरच त्यांची पंच इलेक्ट्रिक कार सादर केली जाणार आहे. ही कार अनेकदा चाचणी दरम्यान रस्त्यावर दिसून आली आहे. कारच्या किमतींबाबतही माहिती लीक झाली आहे.

0

Tata Punch EV Price : टाटा मोटर्सकडून त्यांची पंच एसयूव्ही कार लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर करणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये ही कार लॉन्च करण्याची शक्यता आहे. अलीकडेच पंच एसयूव्ही कारचे सीएनजी मॉडेल सादर करण्यात आले आहे.

पंच इलेक्ट्रिक कार लॉन्च होण्यापूर्वीच कारच्या किमती लीक झाल्या आहेत. अनेकदा ही कार चाचणीदरम्यान दिसून आल्याने कारचे फीचर्स आणि अनेक माहिती देखील उघड झाली आहे. टाटा मोटर्सकडून पंच इलेक्ट्रिक कार ४ व्हेरियंटमध्ये सादर केली जाऊ शकते.

टाटा पंच पेट्रोल व्हेरियंटपेक्षा इलेक्ट्रिक पंचचे बेस मॉडेल 4.50 लाख रुपयांनी महाग असेल. मात्र टाटा मोटर्सकडून अगदी कमी बजेटमध्ये आणखी एक इलेक्ट्रिक कार सादर केली जाणार असल्याने ग्राहकांना स्वस्त ईव्ही कार उपलब्ध होणार आहे.

पंच EV मध्ये ही वैशिष्ट्ये उपलब्ध असतील

टाटा पंच एसयूव्ही कारमध्ये सध्या 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येत आहे. मात्र पंच EV कारची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम 10.2-इंच किंवा 12.3-इंचापर्यंत असू शकते. तसेच कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ आणि टू-स्पोक स्टीयरिंग व्हील दिले जाऊ शकते. चाचणी दरम्यान कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा देखील दिसून आला आहे.

टाटा पंच EV Price

Tata Punch EV Adventure 12 लाख रुपये Ex शोरूम
Tata Punch EV Accomplished 12.85 लाख रुपये Ex शोरूम
Tata Punch EV Creative 13.85 लाख रुपये Ex शोरूम
Tata Punch EV Creative Flagship 14.60 लाख रुपये Ex शोरूम

पंच EV मध्ये Ziptron तंत्रज्ञान

टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक सेगमेंटमधील पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी अनेक EV कार सादर करत आहे. पंच EV कारमध्ये Ziptron पॉवरट्रेन तंत्रज्ञान मिळण्याची शक्यता आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार मोठी रेंज देऊ शकते.

पंच EV ची रेंज 300KM असू शकते

टाटा पंच EV एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे. कंपनीकडून Tiago EV सारखेच 74bhp इलेक्ट्रिक मोटरसह 19.2kWh बॅटरी पॅक पर्याय आणि 61bhp इलेक्ट्रिक मोटरसह 24kWh बॅटरी पॅक पर्याय दिले जाऊ शकतात. ही कार सिंगल चार्जमध्ये 300KM रेंज देण्यास सक्षम आहे.