Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Punch SUV : स्विफ्ट पेक्षा लाख पटीने सुरक्षित आहे टाटाची ही डॅशिंग कार, फक्त ६ लाखांत खरेदी करा 5-स्टार रेटिंग SUV, पहा फीचर्स

टाटा मोटर्सकडून नेहमीच सुरक्षित कार निर्मितीवर भर दिला आहे. तुम्ही मारुतीची स्विफ्ट कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण याच किमतीत टाटाची डॅशिंग कार उपलब्ध आहे.

0

Tata Punch SUV : टाटा मोटर्सकडून नेहमी सुरक्षित कार तयार करण्यावर अधिक भर दिला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. टाटाकडून त्यांच्या नवीन कारमध्ये सर्वाधिक सुरक्षा फीचर्स दिले जात आहेत. त्यामुळे टाटाच्या या सुरक्षित कारकडे अधिक लोक आकर्षित होत आहेत.

मारुती सुझुकीच्या कारला जरी सर्वाधिक पसंती मिळत असली तर या कारमध्ये सर्वाधिक कमी सुरक्षा असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. स्विफ्ट सेडान कार ही देशातील नंबर विक्री होणारी कार असली तरी याच किमतीत सर्वात सुरक्षित कार तुम्ही खरेदी करू शकता.

स्विफ्ट कारला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये फक्त 1-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. स्विफ्ट कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.03 लाख रुपयांपर्यंत जाते.

तुमचेही बजेट 6 ते 8 लाख रुपये असेल तर स्विफ्ट कार न निवडता टाटाची पंच एसयूव्ही कार सर्वोत्तम पर्याय आहे. या कारमध्ये सर्वाधिक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ही एसयूव्ही कार कमी बजेटमध्ये बेस्ट पर्याय आहे.

टाटा पंच

टाटा मोटर्सकडून त्यांच्या पंच एसयूव्ही कारमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आली आहे. ही कार सुरुवातीच्या 6 लाख रुपये किमतीमध्ये सादर करण्यात आली आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.52 लाख रुपये आहे. टाटा पंच कारची बिल्ड गुणवत्ता आणि मायलेज शानदार आहे. कारमध्ये ५ लोक सहज प्रवास करू शकतात. तसेच कारमध्ये 366 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे.

पंच इंजिन

टाटा पंच एसयूव्ही कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि त्यासोबतच सीएनजी पर्याय देखील दिला जात आहे. कारचे इंजिन 88 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करते. 5-स्पीड मॅन्युअल तसेच 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स ट्रान्समिशन देण्यात आले आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये ही कार 20.09kmpl आणि CNG मध्ये 26.99km/kg मायलेज देण्यास सक्षम आहे.

वैशिष्ट्ये देखील उत्तम

टाटा पंच कारमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि क्रूझ कंट्रोल अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर डिफॉगर, रिअर पार्किंग सेन्सर, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ISOFIX अँकर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.