Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Punch : टाटाचा मोठा निर्णय! पंच SUV च्या सर्व व्हेरियंटमध्ये देणार हे खास फीचर्स, पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सकडून पंच एसयूव्ही कारबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. टाटा मोटर्स पंच एसयूव्ही कारमध्ये नवीन एक आकसरहक फीचर्स जोडणार आहे. त्यामुळे ही कार परिपूर्ण फीचर्स सुसज्ज असणार आहे.

0

Tata Punch : टाटा मोटर्सकडून त्यांची सर्वात स्वस्त एसयूव्ही पंच कार ग्राहकांना ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. पंच एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. आता टाटा मोटर्सने पंच एसयूव्ही कारबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

टाटा मोटर्सने पंच एसयूव्ही कारच्या सर्व व्हेरियंटमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर फीचर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. पंच कारच्या सर्व व्हेरियंटमध्ये 4 इंची डिजिटल स्क्रीन पाहायला मिळेल. यामध्ये स्पीड, वेळ, ओडोमीटर, ट्रिप मीटर, वॉर्निंग लाईट सर्व काही माहिती दिसेल.

पंच पूर्वीपेक्षा मजबूत असेल

टाटा मोटर्सची पंच एसयूव्ही कारमध्ये डिजीटल क्‍लस्‍टर दिल्यानंतर आता ही कार ह्युंदाईच्या मायक्रो एसयूव्ही Exter शी स्पर्धा करेल. ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Exter एसयूव्ही कारच्या सर्व व्हेरियंटमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर फीचर्स देण्यात येत आहे.

टाटा पंच इंजिन

टाटा मोटर्सकडून त्यांच्या सर्वात छोट्या एसयूव्ही पंच कारमध्ये 1.2 लीटर, 3 सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल देण्यात आले आहे. हे इंजिन पेट्रोल मोडमध्ये 84bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे तर सीएनजी मोडमध्ये 76 bhp आणि 97 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

पेट्रोल इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एमटी गिअरबॉक्सशी जोडलेले आहे तर सीएनजी इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. पंच कार चार व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

टाटा पंच वैशिष्ट्ये

पंच कारमध्ये टाटा मोटर्सकडून 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल, एअरबॅग्ज, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर आणि ISOFIX अँकरसह अनेक मानक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

टाटा पंच किंमत आणि सेफ्टी

पंच कारला ग्लोबल NCAP चाचणीमध्ये ५ स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. टाटा मोटर्सची पंच कार सुक्षित कारपैकी एक आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपये आहे.