Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Safari EV : टाटा मोटर्स लॉन्च करणार पहिली इलेक्ट्रिक 7 सीटर कार ! एकदा चार्ज केल्यावर देईल इतकी मोठी रेंज

टाटा मोटर्सकडून आता लवकरच त्याची पहिली इलेक्ट्रिक 7 सीटर कार लॉन्च केली जाणार आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार मोठी रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात येत आहे.

0

Tata Safari EV : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये सध्या इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून त्यांच्या इलेक्ट्रिक कार सादर करत आहेत. सध्या टाटा मोटर्सचे इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांची पहिली ७ सीटर इलेक्ट्रिक कार सादर केली जाणार आहे. हॅरियर ईव्ही आणि सफारी ईव्ही या दोन टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कार लवकरच लॉन्च केल्या जाऊ शकतात. टाटा Safari.ev चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे.

Tata Safari EV

Tata Safari.ev – ब्रँडसाठी नवीन फ्लॅगशिप

टाटा मोटर्सकडून Harrier.ev आणि सफारी EV च्या चाचणी सुरु आहेत. येत्या काही महिन्यात या कार लॉन्च होणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदीदारांना आणखी इलेक्ट्रिक कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या आगामी सफारी EV ची चाचणी सुरु आहे. ही कार ICE मॉडेलसारखे दिसते. टाटा मोटर्सकडून अद्याप या कारबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

सफारी ईव्हीमध्ये ही वैशिष्ट्ये उपलब्ध असतील

टाटा सफारी इलेक्ट्रिक कारचे डिझाईन Tata Nexon फेसलिफ्ट आणि Nexon EV फेसलिफ्ट प्रमाणेच असू शकते. तसेच अनेक नवीन फीचर्स या कारमध्ये जोडले जाऊ शकतात. कारमध्ये इलेक्ट्रिक कारमध्ये व्हर्टिकल सेट हेडलाइट्स, रुंद कनेक्टिंग आणि डायनॅमिक डीआरएल, स्लीक व्हील, पॅनोरॅमिक सनरूफ, ADAS तंत्रज्ञान अशी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात.

तसेच टाटा सफारी इलेक्ट्रिक कारच्या केबिनमध्ये 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स यांसारखी वैशिष्ट्ये देखील असतील.

सिंगल चार्जमध्ये देईल इतकी रेंज

टाटा मोटर्सकडून Safari EV मध्ये मजबूत बॅटरी पॅक वापरला जाऊ शकतो. या इलेक्ट्रिक कारमध्ये 60kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाईल. कारची इलेक्ट्रिक मोटर 200bhp पॉवर आणि 400Nm टॉर्क जनरेट करेल.

सिंगल चार्जमध्ये ही कार सुमारे 500 किमी रेंज देण्यास सक्षम असेल. 7-8 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडण्यास ही कार सक्षम असेल. कारमध्ये ऑल-व्हील ड्राईव्ह (AWD) चा पर्याय देखील दिला जाईल. भारतीय बाजारपेठेत या कारची एक्स शोरूम किंमत 23 लाख रुपये असेल.