Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Safari Facelift : 5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि शक्तिशाली इंजिन! खरेदी करा देशातील सर्वात सुरक्षित SUVs, किंमत फक्त

तुम्हालाही कमी बजेटमध्ये शानदार सुरक्षा फीचर्स असलेली कार खरेदी करायची असेल तर बाजारात एक डॅशिंग एसयूव्ही कार उपलब्ध आहे. या कारला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

0

Tata Safari Facelift : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या शानदार कार उपलब्ध आहेत. सध्या एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. अशा काळात अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर करत आहेत.

तुम्हालाही नवीन एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर टाटा मोटर्सने अलीकडेच सादर केलेली सफारी फेसलिफ्ट कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या कारमध्ये जबरदस्त सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.

टाटा सफारी फेसलिफ्ट आणि हॅरियर फेसलिफ्ट कार देशातील सर्वाधिक सुरक्षित कारमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. या कारमध्ये लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत अनेक जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत.

सफारी फेसलिफ्ट कारला क्रॅश चाचणीमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. टाटा सफारी फेसलिफ्ट कारमध्ये प्रीमियमफीचर्स जोडण्यात आले आहेत. तसेच कारच्या डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. या कारला लहान मुलांच्या सुरक्षेसाठी सर्वाधिक गुण मिळाले आहेत. सफारी फेसलिफ्ट कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 16.19 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 27.34 लाख रुपये आहे.

सफारी फेसलिफ्ट एसयूव्हीला किती रेटिंग मिळाले?

टाटा मोटर्सकडून त्यांच्या सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स दिले गेले आहेत. या कारला ग्लोबल NCAP च्या क्रॅश चाचणीमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. क्रॅश चाचणीमध्ये ४९ गुणांपैकी ४५ गुण मिळाले आहेत. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ही कार सर्वोत्तम आहे.

सफारी फेसलिफ्ट वैशिष्ट्ये

सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 10.25-इंचाची हरमन टचस्क्रीन प्रणाली, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, अॅम्बियंट लाइटिंग, वायरलेस फोन चार्जिंग, हवेशीर समोर आणि मध्य-पंक्तीच्या सीट्स आणि पॅनोरॅमिक सनरूफ अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच सुरक्षेसाठी कारमध्ये ADAS सारखे जबरदस्त सुरक्षा फीचर्स दिले आहे.

सफारी फेसलिफ्टमध्ये शक्तिशाली डिझेल इंजिन

टाटा मोटर्सने त्यांच्या सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये शक्तिशाली 2-लिटर डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 170 PS पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. टाटा मोटर्स लवकरच सफारी फेसलिफ्ट कारचे पेट्रोल व्हेरियंट सादर करणार आहे.