Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Safari Facelift : सफारी फेसलिफ्ट 7 व्हेरियंटमध्ये होणार लॉन्च! पहा तुमच्यासाठी कोणते व्हेरियंट आहे खास?

टाटा सफारी फेसलिफ्ट लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. या कारमध्ये अनके बदल केले जाऊ शकतात. तसेच नवनवीन फीचर्स देखील जोडले जाऊ शकतात.

0

Tata Safari Facelift : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांची सफारी फेसलिफ्ट कार लवकरच लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले जाणार आहेत. तसेच ही कार नवीन व्हेरियंटमध्ये भारतात दाखल केली जाऊ शकते.

टाटा सफारी एसयूव्ही कार भारतात सर्वात प्रथम 1998 मध्ये पहिल्यांदा दाखल करण्यात आली होती. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता ग्राहकांचा चांगला प्रतिसाद पाहता टाटा मोटर्स या कारचे नवीन व्हेरियंट सादर करणार आहे.

खालील व्हेरियंटमध्ये लॉन्च होणार सफारी फेसलिफ्ट

Tata Safari Smart (O)

टाटा सफारी फेसलिफ्ट कारचे Smart (O) हे बेस मॉडेल असणार आहे. या व्हेरियंटमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, कनेक्टेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि कनेक्टेड एलईडी टेललाइट्स देण्यात येतील. या कारच्या चारही चाकांवर डिस्क ब्रेकसह 17-इंच अलॉय व्हील्स देण्यात येणार आहेत. या व्हेरियंटमध्ये सनरूफ मिळणार नाही.

Tata Safari Pure (O)

टाटा मोटर्सची सफारी फेसलिफ्टचे Smart (O) हे दुसरे व्हेरियंट असणार आहे. यामध्ये रीअरव्ह्यू कॅमेरा, शार्क-फिन अँटेना, वॉशरसह मागील वायपर, स्टीयरिंग-माउंट केलेले नियंत्रणे, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्ड करण्यायोग्य ORVM आणि रिमोट सेंट्रल लॉकिंग आणि 6-स्पीकर हरमन ऑडिओ सिस्टमसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येणार आहे.

Tata Safari Adventure

टाटा सफारी फेसलिफ्टमध्ये Adventure व्हेरियंट देखील पाहायला मिळू शकते. या व्हेरियंटमध्ये फ्रंट एलईडी फॉग लॅम्प आणि फॉलो-मी हेडलॅम्प देण्यात येतील. 18-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स कारमध्ये पाहायला मिळतील.

तसेच कारमध्ये पुश स्टार्ट/स्टॉप बटण, सॉफ्ट-टच डॅशबोर्ड, अॅम्बियंट लाइटिंग, लंबर सपोर्टसह उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, एक-टच अप/डाऊन ड्रायव्हर विंडो, कूल्ड स्टोरेजसह फ्रंट आर्मरेस्ट, कप होल्डर्ससह फ्रंट आर्मरेस्ट अशी वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

Tata Safari Adventure+

टाटा सफारी फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये Adventure+ हे व्हेरियंट देखील दिले जाणार आहे. या व्हेरियंटमध्ये वरच्या सर्व व्हेरियंटमधील सर्व फीचर्स पाहायला मिळतील. तसेच ऑटोमॅटिक हेडलॅम्प, मूड लाइट्ससह व्हॉईस असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री सराउंड कॅमेरा, वायरलेस चार्जर आणि एअर प्युरिफायर देखील दिले जाणार आहे.

Tata Safari Accomplished

Tata Safari चे Accomplished व्हेरियंट देखील तुमच्यासाठी उत्तम आहे. या व्हेरियंटमध्ये समोर आणि मागील एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, अनुक्रमिक टर्न इंडिकेटर्स, कॉर्नरिंग फॉग लॅम्प्स, मागील फॉग लॅम्प्सवर स्वागत आणि गुडबाय अॅनिमेशन आणि 19-इंच ड्युअल-टोन डायमंड-कट अलॉय व्हील अशी वैशिष्ट्ये देण्यात येतील. तसेच कारमध्ये 12.3-इंच हरमन-सोर्स्ड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये 7 एअरबॅग पाहायला मिळू शकतात.

Tata Safari Adventure+ A

टाटा सफारी फेसलिफ्ट लवकरच Adventure+ A व्हेरियंटमध्ये देखील पाहायला मिळू शकते. हे या कारचे सेकंड टॉप व्हेरियंट असू शकते. या व्हेरियंटमध्ये वरील व्हेरियंटमधील सर्व फीचर्स पाहायला मिळू शकतात. तसेच या कारमध्ये विशेष म्हणजे ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये पाहायला मिळू शकते.

Tata Safari Accomplished+

टाटा सफारी फेसलिफ्ट कारचे Accomplished+ हे टॉप मॉडेल असू शकते. या व्हेरियंटमध्ये बाकी सर्व व्हेरियंटचे फीचर्स पाहायला मिळू शकतात. याव्यतिरिक्त, हे iRA 2.0 सह कनेक्टेड वाहन तंत्रज्ञान, JBL-स्रोत 10-स्पीकरसह हरमन ऑडिओवर्क्स प्रगत संगीत प्रणाली, अलेक्सा बिल्ट-इन कमांड्स, आपत्कालीन कॉल आणि ब्रेकडाउन कॉल असिस्ट हे फीचर्स देखील दिले जाऊ शकतात. तसेच कारमध्ये ADAS फीचर्स देखील दिले जाऊ शकते.