Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Sumo EV : टाटाची Sumo अवतरणार इलेक्ट्रिक अवतारात ! देणार 312 किमी रेंज, किंमत असणार फक्त…

0

Tata Sumo EV : टाटा मोटर्सकडून सध्या भारतात त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. सध्या टाटा मोटर्सचे भारतीय ऑटो मार्केटमधील इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्स त्यांचा इलेक्ट्रिक सेगमेंट आणखी मजबूत करण्यासाठी नवीन कार लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या सध्या अनेक इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च केल्या असल्या तरी टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक नवीन नवीन इलेक्ट्रिक कार पुन्हा एकदा लॉन्च केल्या जाणार आहेत. टाटाच्या सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या सुमो एसयूव्ही कारमध्ये देखील इलेक्ट्रिक पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्स 2024 मध्येच त्यांची सुमो इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकते. टाटा मोटर्सची सुमो 7-सीटर इलेक्ट्रिक SUV असेल

टाटा मोटर्सकडून त्यांच्या सुमो इलेक्ट्रिक कारमध्ये 50kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच एक मजबूत इलेक्ट्रिक मोटर देखील दिली जाऊ शकते. ही इलेक्ट्रिक मोटर 130 bhp पॉवर आणि 260 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. kW फास्ट चार्जर कारमध्ये दिला जाईल.

टाटा सुमो इलेक्ट्रिक रेंज

टाटा मोटर्सने अलीकडे त्यांच्या Nexon EV कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक दिला आहे. Nexon EV फेसलिफ्ट एसयूव्ही कार 465 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. टाटाकडून त्यांच्या सुमो इलेक्ट्रिक कारमध्ये देखील असाच बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. त्यामुळे कारची रेंज देखील Nexon EV कारसारखीच असू शकते.

टाटा सुमो इलेक्ट्रिक फीचर्स

टाटा मोटर्स त्यांच्या सर्वच कारमध्ये जबरदस्त प्रीमियम फीचर्स देत आहे. आगामी सुमो इलेक्ट्रिक कारमध्ये 10.4-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग पॅड, पॅनोरामिक सनरूफ यासह अनेक मानक वैशिष्ट्ये सुमो EV कारमध्ये पाहायला मिळतील.

टाटा सुमो इलेक्ट्रिक किंमत

टाटा मोटर्सकडून अद्याप त्यांच्या आगामी सुमो इलेक्ट्रिक कारबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र त्यांच्या सुमो इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची अंदाजे एक्स शोरूम किंमत 12.5 लाख रुपये असू शकते.

टाटा सुमो इलेक्ट्रिक लॉन्च तारीख

टाटा मोटर्सकडून 2024 या वर्षांमध्ये त्यांच्या अनेक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत. 2024 च्या सुरुवातीला टाटा मोटर्स सुमो EV कार लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. लवकरच टाटा मोटर्स त्यांच्या सुमो EV कारबद्दल अधिकृत माहिती जाहीर करेल.