Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Sumo परत मार्केट गाजवणार ! स्कॉर्पियो, XUV700 ला देणार टक्कर, ‘असे’ असतील नव्या सुमोमध्ये फिचर्स

0

Tata Sumo : टाटा मोटर्स हे देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रात एक विश्वसनीय नाव बनले आहे. टाटाच्या अशा अनेक गाड्यां आहेत ज्या ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे टाटा ही देशातील एक नामांकित आणि जुनी ऑटोमोबाईल कंपनी आहे. या कंपनीच्या कार्सचे अनेक लोक दिवाने आहेत. टाटा नवनवीन एसयूव्ही कारची निर्मिती करत आहे आणि आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार बाजारात आणत आहे.

अशातच आता टाटा मोटर्सबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कंपनी आपली एक जुनी आणि लोकप्रिय कार सुमो पुन्हा एकदा बाजारात आणणार आहे. खरे तर देशात एक काळ असा होता जेव्हा टाटा सुमो ही प्रत्येकाची फेवरेट कार होती. या कारची लोकप्रियता एवढी वाढली होती की खेडे असो वा शहर प्रत्येक ठिकाणी ही कार नजरेस पडत असे. नवयुवक तरुणांना देखील या कारने प्रचंड वेड लावले होते.

मात्र ऑटोमोबाईल क्षेत्रासंदर्भात घेतलेल्या काही निर्णयामुळे या गाडीचे प्रोडक्शन बंद करण्यात आले. भारत सरकारच्या काही नवीन नियमांमुळे या कारचे प्रोडक्शन कंपनीला बंद करावे लागले. आता मात्र पुन्हा एकदा नवीन ढंगात आणि नवीन रूपात टाटा सुमोची एन्ट्री होणार आहे. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात सेवन सीटर MPV कारची वाढती मागणी पाहता कंपनीने पुन्हा सुमो बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

आता कंपनी टाटा सुमोला एका नवीन रूपात, नवीन पावरफुल इंजिन आणि फीचर्स समवेत बाजारात आणू शकते असा कयास लावला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कंपनीने हॅरियर ही आपली सेव्हन सीटर कार लॉन्च केली आहे. अशातच आता सेवन सीटर कार सेगमेंट मध्ये कंपनी आपली जुनी सुमो नवीन फीचर्स आणि इंजिन सह बाजारात उतरवणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

नवीन टाटा सुमो मध्ये काय काय फीचर्स राहणार

मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर लवकरच टाटा सुमो ही सेव्हन सीटर MPV कार लॉन्च करणार आहे. या नवीन कारमध्ये डीआरएलसह ऑल-एलईडी लाइटिंग सेटअप राहणार आहे. या कारला स्टायलिश लुक देण्यासाठी त्याच्या डिझाईनमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. तसेच ही नवीन सुमो पेट्रोल इंजिनसह बाजारात आणले जाऊ शकते असे सांगितले जात आहे.

नवीन टाटा सुमो कारमध्ये 12.3-इंच किंवा 10.25-इंच टचस्क्रीन सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 2-स्पोक किंवा 4-स्पोक स्टीयरिंग व्हील यांसारखे अनेक हायटेक फीचर्स राहणार आहेत. टाटा लोगो, एलईडी हेडलॅम्प लाइट्स, लेदरेट अपहोल्स्ट्री, अॅम्बियंट लाइटिंग, जेबीएल स्पीकर, सनरूफ, एडीएएस टेक्नॉलॉजी सोबत अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम, नो रिटर्न, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ऑटोमॅटिक हायवे असिस्ट आणि आपत्कालीन ब्रेकिंग सिस्टम या तंत्रज्ञानासह ही नवीन सुमो कार बाजारात येणार आहे. ही गाडी जर बाजारात आली तर स्कॉर्पिओ आणि एक्सयूव्ही या कार्ससोबत स्पर्धा करणार आहे.