Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Tiago : WagonR च्या किमतीत खरेदी करा टाटाची 4-स्टार सेफ्टी रेटिंग कार, देते 26 Kmpl मायलेज

0

Tata Tiago : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी म्हणून मारुती सुझुकीकडे पाहिले जाते. मात्र मारुती सुझुकी नेहमी त्यांच्या कारमध्ये सर्वात कमी सुरक्षा फीचर्स देत असते. तुम्हीही मारुतीची WagonR खरेदी करणार असाल तर जरा थांबा.

मारुती सुझुकी WagonR कार खरेदी करण्यापूर्वी तुम्ही टाटा मोटर्सच्या सुरक्षित कारचा विचार करू शकता. टाटा मोटर्सकडून नेहमी त्यांच्या जबरदस्त सुरक्षा फीचर्स असलेल्या कार सादर केल्या जात आहेत.

 

WagonR कारच्या किमतीमध्ये तुम्ही टाटा मोटर्सची Tiago कार खरेदी करू शकता. या कारमध्ये कमी किमतीत उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये तुम्हालाही ही एक सुरक्षित 4-स्टार सेफ्टी रेटिंग कार उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी WagonR कारला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 1-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे WagonR कारची बिल्ड गुणवत्ता किती खराब आहे यावरून दिसत आहे. टाटा मोटर्सच्या Tiago कारला ग्लोबल NCAP चाचणीमध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

Tata Tiago किंमत

टाटा मोटर्सकडून Tiago एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.60 लाख रुपये ठेवली आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.20 लाख रुपये आहे. WagonR कारच्या किमतीमध्ये तुम्ही 4-स्टार सेफ्टी रेटिंग कार खरेदी करू शकता.

Tata Tiago इंजिन

टाटा मोटर्सने Tiago कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 86 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारमध्ये CNG पर्याय देखील देण्यात आला आहे.

कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. कारचे पेट्रोल मॉडेल 19.01 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजी मॉडेल 26.49 Kmpl मायलेज देते.

Tata Tiago वैशिष्ट्ये

टाटा Tiago कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, LED DRLs सह प्रोजेक्टर हेडलाइट्स, बॅक वायपर आणि रिअर डिफॉगर असे फीचर्स दिले आहेत.

तसेच 8-स्पीकर साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्स सारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत. Tiago कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर, EBD सह ABS आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कॉर्नरिंग स्टॅबिलिटी कंट्रोल असे फीचर्स उपलब्ध आहेत.