Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Tiago CNG Offer : 32 Kmpl मायलेज देणारी Tiago CNG खरेदीची सुवर्णसंधी! मिळतेय हजारोंची बंपर सूट, त्वरित घ्या फायदा

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Tiago सीएनजी कारवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे या महिन्यात कार खरेदी तुम्ही पैशांची बचत करू शकता.

0

Tata Tiago CNG Offer : टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक सीएनजी कार ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. टाटा मोटर्सच्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये चांगले वर्चस्व आहे. आता टाटा मोटर्सकडून त्यांच्या Tiago CNG कारवर हजारो रुपयांची बंपर सूट दिली जात आहे.

टाटा मोटर्सकडून Tiago सीएनजी कारवर ३० सप्टेंबरपर्यंत मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्ही ही सीएनजी कार खरेदी करून पैशांची मोठी बचत करू शकता. तसेच ही कार दमदार मायलेज देण्यास सक्षम आहे.

टाटा टियागो सीएनजी

टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक सीएनजी कार उपलब्ध केल्या आहेत. मात्र टियागो सीएनजी कारला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसत आहे. या कारवर 50 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Tiago चे CNG मॉडेल सिंगल सिलेंडर आणि डबल सिलिंडर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

टाटा टियागो सीएनजी डबल सिलेंडर

टाटा टियागो डबल सिलेंडर सीएनजी कारवर कंपनीकडून कमी सूट दिली जात आहे. जर सप्टेंबर महिन्यात तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्हाला या कारवर 20 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ही सूट एक्सचेंज बोनसच्या स्वरूपात दिली जात आहे.

Tata Tiago CNG किंमत आणि इंजिन

Tiago CNG कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार पेट्रोल व्हर्जनमध्ये 22 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तसेच सीएनजी कारवर 32 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.60 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.20 लाख रुपये आहे.

Tiago सुरक्षा वैशिष्ट्ये

टाटा Tiago कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून EBD आणि कॉर्नरिंग स्टॅबिलिटी कंट्रोलसह ABS, हरमन-कार्डन म्युझिक सिस्टीम, पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले टच स्क्रीन, रिव्हर्स कॅमेरा आणि ऑटोमॅटिक एसी अशी वैशिष्ट्ये देण्यात येत आली आहेत.