Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Tiago EMI Plan : अवघ्या 1 लाखात खरेदी करा Tiago EV! सिंगल चार्जमध्ये देते 250 किमी रेंज, पहा फीचर्स

टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक कार भारतीय ऑटो बाजारात सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटा मोटर्सची Tiago इलेक्ट्रिक कार तुम्ही अवघ्या १ लाखात घरी आणू शकता.

0

Tata Tiago EMI Plan : भारतीय ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कार निर्मितीवर अधिक भर देत आहेत. सध्या इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचे वर्चस्व आहे. टाटा मोटर्सने त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत.

तुम्हालाही कमी बजेटमध्ये टाटा मोटर्सची Tiago EV कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण तुम्ही Tiago EV कार अवघ्या १ लाखात घरी घेऊन जाऊ शकता. टाटा Tiago EV कारच्या बेस मॉडेलवर EMI प्लॅन उपलब्ध आहे.

Tata Tiago EV किंमत

टाटा मोटर्सकडून त्यांची Tiago EV कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांचा देखील या कारला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8,69,000 रुपये आहे तर ऑन रोड किंमत 9,05,345 रुपये आहे. त्यामुळे ही कार खरेदी करण्यासाठी ९ लाख रुपयांपेक्षा जास्त बजेट असणे आवश्यक आहे.

Tata Tiago EV EMI योजना

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Tiago EV कारवर EMI प्लॅन ऑफे केला जात आहे. ९ लाख रुपयांचे बजेट नसेल तर १ लाख रुपयांचे डाऊनपेमेंट भरून तुम्ही ही कार घरी आणू शकता. १ लाख रुपये डाऊनपेमेंट भरल्यानंतर तुम्हाला बँकेकडून 8,05,345 रुपयांचे कर्ज दिले जाईल. या कर्जावर तुमच्याकडून 9.8 टक्के वार्षिक व्याज आकारले जाईल.

8,05,345 रुपयांचे कर्ज तुम्हाला बँकेकडून 5 वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाईल. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दरमहा 17,032 रुपयांचा EMI भरावा लागेल. टाटा मोटर्सने Tiago EV कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक दिला आहे.

Tata Tiago EV बॅटरी बॅकअप

टाटा मोटर्सने त्यांच्या Tiago EV कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक वापरला आहे. कारमध्ये 19.2 kWh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कारचे इलेक्ट्रिक मोटर 60.34 bhp पॉवर जनरेट करते. कारची बॅटरी 58 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 10 ते 80 टक्के चार्ज होते. सिंगल चार्जमध्ये ही कार 250 किमीची ड्रायव्हिंग रेंज देण्यास समर्थ समर्थ आहे.