Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Swift साठी अडचण बनली टाटाची ‘ही’ स्वस्त कार, दमदार मायलेज अन् भन्नाट फीचर्ससह किंमत आहे फक्त .. । Tata Tiago

मात्र Maruti Swift ला टक्कर देण्यासाठी टाटाने  5.60 लाख ते 8.11 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीसह आपली स्वस्त आणि मस्त कार Tata Tiago  लॉन्च केली आहे. जी सध्या उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजमुळे भारतीय ऑटो बाजारात धुमाकूळ घालत Maruti Swift ला टक्कर देत आहे.

0

Tata Tiago:  देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी  मारुती सुझुकीची लोकप्रिय कार Maruti Swift सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ही कार खरेदीसाठी बाजारात तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.

मात्र Maruti Swift ला टक्कर देण्यासाठी टाटाने  5.60 लाख ते 8.11 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीसह आपली स्वस्त आणि मस्त कार Tata Tiago  लॉन्च केली आहे. जी सध्या उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजमुळे भारतीय ऑटो बाजारात धुमाकूळ घालत Maruti Swift ला टक्कर देत आहे.

हे जाणून घ्या कि बाजारात जून 2023 मध्ये मारुती स्विफ्ट ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे, तर सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये टाटा टियागो 17 व्या क्रमांकावर आहे. मात्र  जून 2023 मध्ये Tiago ने YoY विक्री वाढीच्या बाबतीत मारुती स्विफ्टला मागे टाकले आहे. यातच जर तुम्ही स्वस्तात मस्त नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टाटाची स्वस्त कार Tata Tiago सर्वात भारी पर्याय ठरू शकते. चला मग जाणून घेऊया Tata Tiago च्या फीचर्स, इंजिन तसेच व्हेरियंट आणि किमतीबद्दल सविस्तर माहिती.

Tata Tiago शक्तिशाली इंजिन आणि किंमत

Tata Tiago मध्ये कंपनीने 1.2-लीटर पेट्रोल इंजिन दिला आहे.  जे 86Ps पॉवर आणि 113Nm टॉर्क निर्माण करते. ज्यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. याची किंमत रु. 5.60 लाख ते रु. 8.11 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे, 242 लीटर बूट स्पेस मिळते, तसेच इंजिनसह CNG पर्याय, CNG मॉडेल फक्त 5-स्पीड MT गिअरबॉक्ससह येते. ज्यामुळे ही कार आणखी मजबूत होते.

Tata Tiago फीचर्स आणि रंग

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर नवीन Tata Tiago XT(O) व्हेरियंटमध्ये व्हील कव्हर्स, ORVMs वर LED इंडिकेटर, AC, इन्फोटेनमेंट सिस्टमभोवती पियानो ब्लॅक फिनिश, फॉलो-मी-होम हेडलॅम्प, स्पीड-डिपेंडेंट ऑटो डोअर लॉक, पंक्चर रिपेअर किट, चार स्पीकर, फ्रंट आणि रियर पॉवर विंडो, आणि या कारला ORVM सोबत रंगीतपणे अॅडजस्ट करता येण्याजोगे पॉवर विंडो देण्यात आले आहे.

Tata Tiago विक्री आकडे

माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की गेल्या महिन्यात म्हणजेच जून 2023 मध्ये मारुती स्विफ्टच्या एकूण 15,955 युनिट्सची विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या जून 2022 मधील 16,213 युनिटच्या तुलनेत सुमारे 2 टक्के कमी आहे.

दुसरीकडे, जर आपण Tata Tiago च्या विक्रीबद्दल बोललो तर, जून 2023 मध्ये  8,135 युनिट्सची विक्री झाली आहे, जी जून 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 5,310 युनिट्सपेक्षा 53 टक्के जास्त आहे. अशा स्थितीत टियागो मारुतीसाठी अडचणीचे ठरत आहे.