Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Tigor : मारुती डिझायरपेक्षा लाख पटीने सुरक्षित आहे टाटाची ही कार, 5-स्टार सुरक्षा रेटिंग आणि किंमत फक्त 6 लाख

मारुती सुझुकीची डिझायर खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण याच किमतीमध्ये तुम्ही टाटाची जबरदस्त सुरक्षा फीचर्स असलेली उत्कृष्ट कार खरेदी करू शकता.

0

Tata Tigor : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या अनेक शानदार कार सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच टाटा मोटर्स त्यांच्या नवीन कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्याचा प्रयत्न करत आहे.

देशातील सर्वात सुरक्षित कार म्हणून टाटा मोटर्सच्या कारकडे पाहिले जाते. टाटा मोटर्स अगदी कमी बजेटमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग असलेल्या आणि दमदार मायलेज देणाऱ्या कार सादर करत आहे. तुम्ही मारुती सुझुकी डिझायर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण टाटा मोटर्सची Tigor कार डिझायर कारपेक्षा लाख पटीने सुरक्षित कार मानली जाते.

टाटा मोटर्सच्या Tigor कारला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले आहे तर मारुतीच्या डिझायर कारला फक्त 2-स्टार रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे डिझायर कारच्या Tigor कार उत्तम मानली जात आहे.

टाटा मोटर्सने त्यांची Tigor कार पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. ही कार दमदार मायलेज देण्यास सक्षम आहे. तसेच कारची किंमत देखील खूपच कमी आहे. Tigor देशात विकली जाणारी ही एकमेव सेडान कार आहे जी पेट्रोल, CNG आणि इलेक्ट्रिक या तिन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

टाटा Tigor इंजिन

टाटा मोटर्सची Tigor कार XE, XM, XZ आणि XZ+ या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. कारमध्ये 419 लीटरची बूट स्पेस उपलब्ध आहे. तसेच Tigor कारमध्ये 1.2 लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 86 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

टाटा Tigor मायलेज आणि किंमत

टाटा मोटर्सची Tigor कार दमदार मायलेज देण्यास सक्षम आहे. ही कार पेट्रोल व्हेरियंटमध्ये 19.60 किमी आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये 26.49 किमी मायलेज देण्यास सक्षम आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.30 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.95 लाख रुपये आहे.

टाटा Tigor वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सकडून त्यांच्या Tigor कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रेन-सेन्सिंग वायपर, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, कीलेस एंट्री आणि ऑटो एसी अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस-एबीडी, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स, क्रूझ कंट्रोल, फॉग लॅम्प आणि एलईडी डीआरएल सारखी फीचर्स दिले आहेत.