Tata कंपनीच्या ‘या’ 6.30 लाख रुपयांच्या कारवर मिळतोय 90 हजाराचा डिस्काउंट

Tata Tigor Discount Offer : आपल्यापैकी अनेकांचे नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल. काही लोकांचे नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असेल तर काही लोक अजूनही यासाठी पैशांची जमवाजमव करत असतील. दरम्यान जर तुम्हीही येत्या काही दिवसात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी डिस्काउंट ऑफर आहे.

ज्या लोकांना टाटा कंपनीची कार खरेदी करायची असेल त्यांना आता स्वस्तात कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, टाटा कंपनीने आपल्या एका लोकप्रिय कारवर तब्बल 90 हजार रुपयांची डिस्काउंट ऑफर आणली आहे. टाटा कंपनीने आपल्या लोकप्रिय टिगोर या कारवर 90 हजाराचा डिस्काउंट ऑफर आणली आहे. खरंतर, टाटा टिगोरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत टॉप मॉडेलसाठी 6.30 लाख ते 9.55 लाख रुपये आहे.

मात्र जे लोक ही गाडी या चालू मे महिन्यात खरेदी करतील त्यांना या किमतीपेक्षा कमीमध्ये ही गाडी खरेदी करता येणार आहे. पण, या ऑफरचा फक्त या चालू महिन्यात कार खरेदी करणाऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. कारण की, ही ऑफर फक्त 30 मे 2024 पर्यंतचं मर्यादित आहे. दरम्यान, आता आपण टाटा कंपनीची ही डिस्काउंट ऑफर नेमकी कशी आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Tata Tigor वर मिळणार 90 हजाराचा डिस्काउंट
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी आपल्या गाडींवर डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे. टाटा कंपनीने देखील डिस्काउंट ऑफर चालवली आहे. कंपनी टाटा टिगोरच्या पेट्रोल व्हेरिएंटवर तब्बल 90,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

याशिवाय, ग्राहकांना Tata Tigor 1-सिलेंडर CNG व्हेरियंटवर 90,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या ऑफरमध्ये 70,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट याचा समावेश आहे.

दुसरीकडे, कंपनी Tata Tigor 2-सिलेंडर CNG व्हेरियंटवर 80,000 रुपयांची कमाल सूट देत आहे. या ऑफरमध्ये 60,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट याचा समावेश आहे. यामुळे ज्यांना येत्या काही दिवसात ही गाडी खरेदी करायची असेल त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment