Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki ची लागणार वाट! टाटा लाँच करणार ‘ह्या’ जबरदस्त 3 SUV; पहा फोटो। Tata Upcoming Car

ग्राहकांची ही मागणी लक्षात घेता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहिती नुसार पुढील  2-3 महिन्यांत टाटा या  3 जबरदस्त एसयूव्ही कार्स लाँच करणार आहे.

0

Tata Upcoming Car :  देशातील लोकप्रिय ऑटो कंपनीपैकी एक असणारी ऑटो कंपनी टाटा मोटर्स येत्या काही दिवसात देशातील बाजारपेठेमध्ये उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह ३ जबरदस्त एसयूव्ही कार्स लाँच करणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या देशातील बाजारात मिड साइज एसयूव्हीची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांची ही मागणी लक्षात घेता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहिती नुसार पुढील  2-3 महिन्यांत टाटा या  3 जबरदस्त एसयूव्ही कार्स लाँच करणार आहे. चला मग जाणून घेऊया बाजारात येत्या काही दिवसात टाटा कोणत्या कोणत्या एसयूव्ही कार्स लाँच करणार आहे.

Tata Nexon Facelift

टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉनचे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या नवीन मॉडेलचे अपडेट्स सातत्याने येत आहेत. यावेळी नवीन मॉडेलमध्ये अनेक मोठे बदल अपेक्षित आहेत. सूत्रानुसार, नवीन नेक्सॉनच्या डिझाईनपासून ते त्याच्या इंटीरियरपर्यंत आणि फीचर्सपर्यंत मोठे बदल होणार आहेत तसेच इंजिनमध्येही नवीनपणा जाणवेल. म्हणजेच इंजिनमध्ये अनेक तांत्रिक बदल अपेक्षित आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन मॉडेलच्या फ्रंटला एक नवीन बोनेट दिसेल, त्यासोबत नवीन हेडलॅम्प देखील दिले जातील. याशिवाय, त्याच्या साइड प्रोफाइलपासून रियरपर्यत बरेच बदल केले जातील आणि ते पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी फीलसह येईल. इतकंच नाही तर नवीन डिझाईन असलेली अलॉय व्हील्सही यात पाहायला मिळतील.

Tata Harrier आणि Safari

Nexon सोबत, Tata Motors देखील फेसलिफ्टेड हॅरियर आणि सफारी लाँच करणार आहे. दोन्ही मॉडेल्सच्या डिझाईनमध्ये मोठे बदल होणार असून नवीन फीचर्सचाही समावेश अपेक्षित आहे. इतकंच नाही तर नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला नवीन इंजिनही पाहायला मिळतात.

असे मानले जात आहे की या वर्षी ऑक्टोबरपर्यंत नवीन मॉडेल बाजारात आणण्यासाठी सज्ज आहेत. टाटा सफारी आणि हॅरियरच्या आधारे टाटा या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करेल.