Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Upcoming Cars : टाटा मोटर्स आगामी 2024 मध्ये लॉन्च करणार या 6 डॅशिंग कार्स, पहा यादी

टाटा मोटर्सकडून २०२४ मध्ये त्यांच्या ६ नवीन कार भारतात सादर केल्या जाणार आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक आणि पेट्रोल कारचा समावेश आहे.

0

Tata Upcoming Cars : देशातील ऑटो मार्केटमध्ये टाटा मोटर्स त्यांचा विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. सध्या टाटा मोटर्सच्या अनेक कार ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टाटा मोटर्स २०२४ मध्ये त्यांच्या आणखी ६ नवीन कार लॉन्च करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना टाटाच्या आणखी नवीन कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या नवीन कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देखील दिले जातील.

1. टाटा पंच EV

टाटा मोटर्सकडून त्यांची पंच इलेक्ट्रिक कार २०२४ मध्ये लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये अनके बदल पाहायला मिळतील. कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक दिला जाणार आहे. कार अनेकदा चाचणी दरम्यान रस्त्यावर दिसली आहे. पंच इलेक्ट्रिक कारमध्ये कॉस्मेटिक अपडेट्स पाहायला मिळतील.

2. Tata Curvv EV आणि ICE

टाटा मोटर्स त्यांची नवीन संकल्पनेवर आधारित Curvv एसयूव्ही कार लाँच करणार आहे. ही कार पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर केली जाणारा आहे. सर्वात प्रथम इलेक्ट्रिकमध्ये ही कार सादर केली जाणारा आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 500 किमीपेक्षा जास्त रेंज देईल.

तसेच पेट्रोल Curvv कारमध्ये 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल. ही कार बाजारात लाँच होताच Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Urban Cruiser Hyryder, MG Astor, VW Taigun, Skoda Kushaq शी स्पर्धा करेल.

3. टाटा हॅरियर आणि सफारी पेट्रोल

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची हॅरियर आणि सफारी फेसलिफ्टचे डिझेल इंजिनसह लाँच केली आहे. मात्र आता टाटा मोटर्स हॅरियर आणि सफारी एसयूव्ही कार पेट्रोल इंजिन सह पुन्हा एकदा सादर करू शकते. कारचे पेट्रोल इंजिन 168 bhp पॉवर आणि 280 Nm टॉर्क जनरेट करेल.

4. टाटा हॅरियर EV

टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता त्यांची Harrier EV एसयूव्ही कार २०२४ मध्ये भारतात सादर करू शकते. कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात येईल. २०२३ च्या ऑटो एक्स्पोमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार ५०० किमीपेक्षा जास्त रेंज देईल असा दावा करण्यात आला आहे.