Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Upcoming EV Cars : टाटा मोटर्स लॉन्च करणार आणखी 3 जबरदस्त इलेक्ट्रिक SUV, पहा फीचर्स आणि लॉन्च तारीख

टाटा मोटर्स लवकरच त्यांच्या आणखी ३ जबरदस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही कार सादर करणार आहे. यामधील एक कार या वर्षाच्या अखेरी आणि दोन २०२४ मध्ये लॉन्च केल्या जाऊ शकतात.

0

Tata Upcoming EV Cars : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कारचा अनेकजण पर्याय निवडताना दिसत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

इलेक्ट्रिक कारच्या मागणीमधील वाढ पाहता टाटा मोटर्स त्यांच्या आणखी ३ जबरदस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. सध्या इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सचे वर्चस्व आहे. टाटा मोटर्सच्या अनेक कार इलेक्ट्रिकमध्ये उपलब्ध आहेत.

1. टाटा पंच EV

टाटा मोटर्सची पंच एसयूव्ही कारची वाढती लोकप्रियता पाहता टाटाने पंच सीएनजी व्हेरियंट अलीकडेच लॉन्च केले आहे. आता टाटा मोटर्सकडून पंच एसयूव्ही कारचे इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील लवकरच लॉन्च केले जाणार आहे.

या वर्षाच्या अखेरीस पंच इलेक्ट्रिक कार लॉन्च होऊ शकते. कारमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. नुकतीच लॉन्च झालेली Nexon फेसलिफ्ट ईव्हीमधील काही फीचर्स या कारमध्ये पाहायला मिळू शकतात.

टाटा टियागो ईव्हीमधील दोन्ही बॅटरी पॅक पंच इलेक्ट्रिकमध्ये दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन स्टीयरिंग व्हील, कॅपेसिटिव्ह एचव्हीएसी नियंत्रणे, एक मोठी टचस्क्रीनसह अनेक दमदार फचर्स कारमध्ये दिले जाणार आहेत.

2. Tata Curvv EV

टाटा मोटर्स त्यांची Curvv EV कार पुढील वर्षी भारतात लॉन्च करू शकते. ही कार ट्विन इलेक्ट्रिक मोटर सेटअपसह सुसज्ज असू शकते. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 500 किमी रेंज देईल असा दावा करण्यात येत आहे. Curvv EV कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, एक मोठा टचस्क्रीन आणि डिजिटल क्लस्टर, ड्युअल पेन सनरूफ आणि ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देखील दिले जाऊ शकते.

3. टाटा हॅरियर EV

टाटा मोटर्सने २०२३ च्या ऑटो एक्स्पोमध्ये त्यांची शक्तिशाली एसयूव्ही हॅरियर EV चे अनावरण केले होते. आता टाटा मोटर्स हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट कार लॉन्च करणार आहे. मात्र २०२४ मध्ये टाटा हॅरियर एसयूव्ही कारचे इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील भारतात सादर केले जाऊ शकते.

टाटा हॅरियर EV कारमद्ये मजबूत बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. सिंगल चार्जमध्ये ही कार 500 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते असा दावा करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने ग्राहकांना आता टाटा मोटर्स आणखी ३ इलेक्ट्रिक कार उपलब्ध करून देणार आहे.