Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Upcoming SUV : भारतात लॉन्च होणार टाटाच्या या दोन लक्झरी SUV, मिळणार प्रीमियम फीचर्स…

टाटा मोटर्सच्या आणखी दोन एसयूव्ही कार लवकरच भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकतात. या कारमध्ये शानदार प्रीमियम फीचर्स देखील दिले जाणार आहेत.

0

Tata Upcoming SUV : टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कार नेक्सॉनचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. टाटाची नेक्सॉन एसयूव्ही ही सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही कार आहे. आता टाटाकडून आणखी दोन लक्झरी एसयूव्ही लॉन्च केल्या जाणार आहेत.

टाटा मोटर्सकडून आणखी दोन Tata Harrier आणि Tata Safari या एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत. या कारच्या चाचणी दरम्यान कारच्या इंटेरियरमधील फीचर्स लीक झाले आहेत. पुण्यातील प्लांटजवळ या दोन एसयूव्ही कार दिसल्या आहेत.

1. इंजिन

टाटा सफारी आणि हॅरियरच्या इंजिनमध्ये जास्त काही बदल करण्यात येणार नसल्यचे बोलले जात आहे. या कारमध्ये मॉडेलचे Kryotech 2.0-लिटर 4-सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 168 bhp आणि 350 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

नवीन कारचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशनशी जोडले जाईल. टाटा मोटर्सकडून नवीन 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल युनिटवर काम करत आहे जे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड DCA ट्रान्समिशनसह दिले जाऊ शकते.

2. एक्सटेरियर

टाटा मोटर्सकडून नवीन Nexon कारचे डिझाईन Curve संकल्पनेऊन घेतले आहे. तसेच नवीन एसयूव्ही कारमध्ये टेल लॅम्प्स, अपडेटेड स्प्लिट हेडलॅम्प्स, स्लीक डीआरएल, रिवाइज्ड फ्रंट आणि रियर बंपर आणि अॅलॉय व्हीलवर पूर्णपणे नवीन डिझाइनचा समावेश आहे.

3. इंटेरियर

टाटा मोटर्सच्या हॅरियर आणि सफारीमध्ये मोठे 12.3-इंच इंफोटेनमेंट युनिट असण्याची अपेक्षा आहे. तसेच त्याची केबिन टच-आधारित HVAC नियंत्रणांसह आधुनिक असण्याची शक्यता आहे. दोन्ही मॉडेल्सना संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह नवीन 2-स्पोक स्टीयरिंग व्हील मिळू शकते.

4. वैशिष्ट्ये

हॅरियर-सफारी या दोन नवीन एसयूव्ही कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, अॅम्बियंट इंटीरियर लाइटिंग, 360-डिग्री कॅमेरा, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, वायरलेस चार्जर, फ्रंट टक्कर अलर्ट, ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटो हाय बीम असिस्ट यासारखी लेव्हल 2 ADAS अशी वैशिष्ट्ये मिळू शकतात.