Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Upcoming SUVs : बजेट तयार ठेवा! टाटाच्या दोन जबरदस्त SUV लवकरच अवतरणार नवीन रूपात, डिझाईनसह होणार मोठे हे बदल…

टाटा मोटर्सकडून आगामी काळात त्यांच्या नवीन एसयूव्ही कार सादर केल्या जाणार आहेत. या कारचा टिझर टाटाने रिलीझ केला आहे.

0

Tata Upcoming SUVs : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमधील विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या SUV च्या फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात लॉन्च करत आहे. अलीकडेच टाटा मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही Nexon चे फेसलिफ्ट मोडेल लॉन्च केले आहे.

टाटा मोटर्सकडून त्यांच्या आणखी दोन नवीन एसयूव्ही कार बाजारात सादर केल्या जाणार आहेत. हॅरियर आणि सफारी एसयूव्हीच्या फेसलिफ्ट कार नवीन अपडेट्ससह बाजारात सादर केल्या जाणार आहेत.

टाटा मोटर्सकडून या कारचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये कारचा पुढील भाग दिसत आहे. तसेच कारमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कारच्या डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत.

टाटा मोटर्सकडून कर्व्ह संकल्पनेतून त्यांच्या आगामी कार सादर केल्या जाणार आहेत. Nexon फेसलिफ्ट कारमध्ये देखील कर्व्ह संकल्पना पाहायला मिळत आहे. नवीन हॅरियर आणि सफारी एसयूव्हीच्या फेसलिफ्टच्या इंटेरियरमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

टाटा मोटर्सकडून हॅरियर आणि सफारीच्या फेसलिफ्टसाठी 6 ऑक्टोबरपासून सुरुवात केली जाणार आहे. जर तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही जवळच्या डिलरशिपला भेट देऊन किंवा टाटा मोटर्सच्या ऑनलाईन वेबसाइटवरून या कार बुकिंग करू शकता.

पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते

टाटा मोटर्सकडून त्यांच्या आगामी टाटा हॅरियर आणि सफारीच्या नवीन मॉडेल्समध्ये 2.0 लीटर फियाट इंजिन वापरले जाणार आहे. हे इंजिन इंजिन 168 bhp पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. टाटा मोटर्सकडून नवीन कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन पर्याय दिला जाऊ शकतो. हे इंजिन 168 bhp पॉवर आणि 280 Nm टॉर्क जनरेट करेल.

डिझाइन आश्चर्यकारक असेल

टाटा मोटर्स त्यांच्या कर्व्ह डिझाईनवर नवीन कार सादर करत आहे. आगामी काळात टाटा मोटर्स पूर्णपणे कर्व्ह संकल्पनेवर कार सादर करण्याच्या तयारीत आहे. टाटा हॅरियर आणि सफारीच्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये देखील कर्व्ह डिझाईन पाहायला मिळू शकते.

कारच्या पुढील बाजूस एलईडी लाईट बार मिळणार आहे जो सादर करण्यात आलेल्या टीझरमध्ये दिसत आहे. कारमध्ये नवीन फ्रंट बंपर आणि ग्रिल देण्यात आले आहे. कारचे सिल्हूट मस्क्यूलर बोनेट लाईन्ससह पाहायला मिळत आहे.

इंटीरियर देखील अपडेट केले जाईल

टाटा मोटर्सकडून कारचे फक्त डिझाईनच नाही तर इंटेरियर देखील बदलण्यात आले आहे. टाटा Nexon फेसलिफ्ट कारसारखे स्टीयरिंग व्हील या कारमध्ये पाहायला मिळू शकते. तसेच कारमध्ये नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळण्याची शक्यता आहे.

टाटा मोटर्सकडून आगामी कारमध्ये नवीन डॅशबोर्ड लेआउट, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, 360-डिग्री सराउंड कॅमेरा, नवीन गियर लीव्हर, एअर प्युरिफायर, अॅम्बियंट लाइटिंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ADAS अशी दमदार फीचर्स दिली जाऊ शकतात. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी या कार ऑटो बाजारात लॉन्च केल्या जाऊ शकतात.