Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Upcoming SUVs : टाटा मोटर्स लॉन्च करणार या 4 जबरदस्त SUV कार्स, मिळणार खास फीचर्स

0

Tata Upcoming SUVs : टाटा मोटर्सकडून त्यांच्या आगामी काळात अनेक नवीन एसयूव्ही कार सादर करणार आहे. त्यामुळे टाटा मोटर्सच्या ग्राहकांना आणखी नवीन एसयूव्ही कारचा पर्याय मिळणार आहे. टाटा मोटर्सकडून त्यांच्या आगामी एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स दिले जाणार आहेत.

टाटा मोटर्सकडून इलेक्ट्रिक कार सेगमेंट मजबूत करण्यासाठी त्यांच्या अनेक नवीन इलेक्ट्रिक कार सादर केल्या जाणार आहेत. तसेच यासोबतच पेट्रोल एसयूव्ही कार देखील पुढील वर्षी टाटा मोटर्स लॉन्च करणार आहे.

Tata Curvv EV

टाटा मोटर्सकडून नवीन संकल्पेनवर आधारित त्यांची Curvv एसयूव्ही कार भारतात लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये मजबूत बॅटरी पॅकसह जबदस्त वैशिष्ट्ये दिली जाणार आहेत. टाटा Curvv एसयूव्ही कार सिंगल चार्जमध्ये 500 किमी रेंज देण्यास सक्षम असेल.

टाटा Curvv (ICE)

टाटा मोटर्स त्यांची Curvv EV लॉन्च केल्यानंतर या कारचे पेट्रोल व्हेरियंट देखील लॉन्च करणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा या कारमध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक इंजिन पर्याय मिळणार आहे. कारमध्ये 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर टर्बो-डिझेल इंजिनचा पर्याय मिळू शकतो.

टाटा पंच EV

टाटा मोटर्सची लोकप्रिय एसयूव्ही कार पंच EV कार 2024 मध्ये सादर केली जाणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांसाठी आणखी एका कमी बजेट EV एसयूव्ही कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

टाटा पंच EV कार सिंगल चार्जमध्ये 500 किमी रेंज देऊ शकते. पंच कारमध्ये एक मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, 360-कॅमेरा असे फीचर्स दिले जाऊ शकतात.

टाटा हॅरियर पेट्रोल

टाटा हॅरियर फेसलिफ्ट अलीकडेच भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. मात्र या कारमध्ये फक्त डिझेल इंजिन पर्याय देण्यात आला आहे. पण आता 2024 मध्ये टाटा मोटर्स त्यांची हॅरियर पेट्रोल एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे.

या कारमध्ये 1.5-लीटर TGDI चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात येईल अशी शक्यता आहे. हे इंजिन 168 bhp आणि 280 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.