Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata Upcoming SUVs : टाटा भारतात लॉन्च करणार या 4 मिड साईझ SUV, पहा यादी

टाटा मोटर्स लवकरच त्यांच्या ४ शक्तिशाली एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. त्यामुळे नवीन एसयूव्ही खरेदीदारांना आणखी एसयूव्हीचा पर्याय मिळणार आहे.

0

Tata Upcoming SUVs : देशात एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नवीन कार खरेदीदार एसयूव्ही कारचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता त्यांच्या नवीन एसयूव्ही कार सादर करत आहे.

टाटा मोटर्सने देखील एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता त्यांच्या आणखी नवीन ४ एसयूव्ही कार २०२४ मध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या एसयूव्ही कार आकर्षक आणि शक्तिशाली इंजिनसह सादर केल्या जाऊ शकतात.

1. टाटा कर्व

टाटा मोटर्सची Curvv एसयूव्ही कार देखील २०२४ मध्ये लॉन्च केली जाणार आहे. ही कार २०२३ च्या ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतील.

Curvv एसयूव्ही कारमध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, अॅम्बियंट लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एक फ्री-स्टँडिंग मोठी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात येईल. सर्वात प्रथम ही कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च केली जाणार आहे. त्यानंतर कारचे पेट्रोल व्हेरियंट लॉन्च केले जाईल.

2. टाटा हॅरियर EV

टाटा मोटर्स सध्या इलेक्ट्रिक कार सेगमेंट मजबूत करण्यावर अधिक भर देत आहे. टाटा मोटर्सच्या अनेक इलेक्ट्रिक कार सध्या बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. २०२४ मध्ये टाटा मोटर्स त्यांची हॅरियर EV कार सादर करणार आहे. कारमध्ये 60kWh बॅटरी पॅक दिला जाईल. सिंगल चार्जमध्ये ही कार 500 किमी रेंज देण्यास सक्षम असेल.

3. टाटा हॅरियर आणि सफारी पेट्रोल

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांच्या सफारी आणि हॅरियर कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. मात्र या दोन्ही एसयूव्ही कारमध्ये फक्त डिझेल इंजिन पर्याय देण्यात आला आहे. आता कंपनीकडून या दोन्ही एसयूव्ही कार पेट्रोल इंजिनसह सादर केली जाणार आहे.

सफारी आणि हॅरियर एसयूव्ही कारमध्ये टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. कारच्या इंजिनमध्ये बदल केला जाणार आहे. कंपनीकडून अद्याप याबाबत माहिती दिलेली नाही.