Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Thar Vs Jimny : कोणत्या SUV ची ग्राहकांमध्ये आहे क्रेझ? पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी जिमनी आणि महिंद्रा थार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कारची किंमत आणि इंजिनबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

0

Thar Vs Jimny : देशातील तरुण ऑफ रोडींग कार खरेदी करताना मारुती आणि महिंद्राच्या शक्तिशाली एसयूव्ही कारला चांगला प्रतिसाद देत आहेत. तुम्हालाही मारुती जिमनी किंवा महिंद्रा थार खरेदी करायची असेल तर त्याआधी कोणती एसयूव्ही कार तुमच्यासाठी बेस्ट आहे ते जाणून घ्या.

देशातील ऑटो मार्केटमध्ये ऑफ रोडींग एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. बाजारात अनेक ऑफ रोडींग एसयूव्ही कार उपलब्ध आहेत मात्र महिंद्रा थार आणि मारुती हिमानी एसयूव्हीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

महिंद्रा थार आणि मारुती जिमनी विक्री

ऑक्टोबर २०२३ मधील कार विक्री अहवाल सर्वच ऑटो कंपन्यांनी जाहीर केला आहे. महिंद्रा थार एसयूव्ही कारची 5,593 योनिट्स विकली गेली आहेत तर मारुती जिमनी एसयूव्हीची 1,852 युनिट्स विकली गेली आहेत. तसेच सप्टेंबरमध्ये थारच्या 5,417 युनिट्सची विक्री झाली आहे तर जिमनी एसयूव्हीच्या 2,651 युनिटची विक्री झाली होती.

तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये थारच्या 5,951 युनिट्सची विकी झाली होती तर जिमनीच्या 3,104 युनिट्सची विक्री झाली होती. सर्वात जास्त महिंद्रा थारची विक्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांचा थार एसयूव्हीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मारुती सुझुकी जिमनी किंमत आणि इंजिन

मारुती सुझुकीने महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी त्यांची जिमनी ऑफ रोडींग एसयूव्ही कार सादर केली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.74 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.05 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी जिमनी एसयूव्ही कार Zeta आणि Alpha या दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ही एक ५ सीटर कार असून यामध्ये दोन ड्युअल टोन आणि 5 सिंगल टोन कलर शेड्स पर्याय देण्यात आले आहेत.

जिमनी एसयूव्ही कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 105 PS पॉवर आणि 134 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले आहे. कारला 210 मिमी ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहे.

महिंद्रा थार किंमत आणि इंजिन

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची थार ऑफ रोडींग एसयूव्ही कार गेल्या काही दिवसांपूर्वी बारात सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. थार एसयूव्ही कारमध्ये 150 PS पॉवर आणि 320 Nm चा पीक टॉर्क जनरेट करणारे 2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

तसेच 1.5 लिटर डिझेल इंजिन देखील दिले आहे जे 118 PS पॉवर 300 Nm टॉर्क जनरेट करते. 2.2 लीटर डिझेल इंजिन देखील कारमध्ये उपलब्ध आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.98 लाख रुपयांपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 16.94 लाख रुपयांपर्यंत जाते.