Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Tata, Mahindra, Kia आणि Toyota च्या ह्या चार नव्या कार्स मार्केटमध्ये येणार !

0

नवीन SUV कार खरेदी करण्यासाठी वाट बघत असणार्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीस Tata Motors, Mahindra & Mahindra, Kia Motors आणि Toyota सारख्या कंपन्या आपली नवीन SUV बाजारात आणणार आहेत.

यासोबतच टाटा मोटर्सच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक असलेली इलेक्ट्रिक पंच या कारचा नवीन व्हेरिएन्ट सुद्धा सादर केला जाणार आहे. जाणून घ्या या कारबद्दल.

टाटा पंच इलेक्ट्रिक
दरम्यान, टाटाच्या पंच या इलेक्ट्रिक व्हेरिएंटची बऱ्याच दिवसांपासून सर्वजण वाट पाहत होते. ही कारपुढील वर्षी लॉन्च केली जाऊ शकते. दरम्यान, पॉवरफुल बॅटरीसह या गाडीची रेंज ही 300 किलोमीटरपर्यंत असू शकते. याशिवाय लूक आणि फीचर्सच्या बाबतीत ही एसयूव्ही त्याच्या पेट्रोल आणि सीएनजी मॉडेलसारखीच असणार आहे.

kia सॉनेट फेसलिफ्ट
Kia Motors आपल्या नवीन मॉडेलचे सादरीकरण पुढील वर्षी करणार असून, हे SUV Sonet चे फेसलिफ्टेड मॉडेल असणार आहे. दरम्यान, या कारला अनेक कार्स स्पर्धा म्हणून ठरतात. तर या नवीन कारच्या लूकमध्ये भरपूर बदल दिला जाणार आहे. दरम्यान, येणाऱ्या काळात ही कार Kia Motors, Tata Nexon, Maruti Suzuki Brezza आणि Hyundai Venue सारख्या कार्सला टक्कर देणारी ठरेल.

महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट
एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी महिंद्रा सुद्धा आपली नवीन गाडी बाजारात सादर करणार आहे. महिंद्रा ही आपल्या XUV300 चे फेसलिफ्टेड मॉडेल लॉन्च करणार आहे. दरम्यान, या कारच्या फेसलिफ्टेड मॉडेलची चाचणी खूप दिवस झाले सुरु आहे. यामुळे ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, या कारमध्ये उत्तम फीचर्स सह फ्यूल एफिसिएंसी मिळू शकते. सुरू

टोयोटा टेसर
टोयोटा लवकर आपली सर्वात स्वस्त कार टेसर सादर करणार असून, ही कार मारुतीच्या मारुती सुझुकी फ्रंटवर आधारित असेल.दरम्यान, या चर्चा लूक अप्रतिम असणार असून, पेट्रोल सोबतच CNG पर्यायातही असणारी ही गाडी Tata Punch आणि Hyundai Exeter या गाडयांना स्पर्धा देणारी ठरेल.