Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

मारुतीच्या ह्या कारने सगळं मार्केट खाल्लं ! Tata Nexon सुद्धा राहिली मागे

0

मारुतीची मारुती वॅगनआर ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात वॅगनआरच्या २२,०८० युनिट्सची विक्री झाली होती. तर यानंतर मारुतीच्या स्विफ्ट 20,598 मोटारींच्या विक्रीसह दुसऱ्या स्थानावर राहिली.

तर Tata Nexon ही तिसऱ्या क्रमांकावर येत असून, हिचे 16,887 युनिट्सच्या विक्री केले गेले आहेत. यानंतर मारुती बलेनो 16,594 आणि ब्रेझा 16,050 युनिट्सच्या विक्रीसह चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.

दरम्यान, उत्तम मायलेजमुळे लोकांना WagonR सर्वाधिक आवडते. ही कार पेट्रोलमध्ये 24.43 किमी प्रति लिटर आणि सीएनजीमध्ये 34 किमी प्रति किलो मायलेज देण्यास देते. तर या कारचे इंजिन हे दोन पर्यायामध्ये उपलब्ध आहे,

त्यापैकी पहिल्यामध्ये 67 bhp पॉवरसह 1-लिटर इंजिन आणि 90 bhp पॉवरसह 1.2-लिटर इंजिन येते. यासोबतच ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे.

मारुती वॅगनआरच्या सर्वाधिक विक्रीचे आणखी एक खास कारण म्हणजे त्याचे इंटिरियर. या कारमध्ये मोठी केबिन मिळत असून, चार जणांच्या कुटुंबासाठी ही आरामदायी कार आहे.

या हॅचबॅकमध्ये 341 लीटरची मोठी बूट स्पेस आहे. एकूणच वॅगनआर ही एक आदर्श फॅमिली हॅचबॅक आहे.

ड्युअल-टोन केबिन आणि फॅब्रिक सीट्समुळे मारुती वॅगनआरचे हाय-एंड प्रकार आकर्षक डिझाइनसह येतात. या हॅचबॅकमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, 4-स्पीकर म्युझिक सिस्टम आणि स्टीयरिंग-माउंट ऑडिओ आणि फोन कंट्रोलर ही आहे.

दरम्यान, ही कार ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर आणि हिल-होल्ड असिस्ट (केवळ AMT प्रकारावर) सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये परिपूर्ण आहे.

Maruti WagonR
Maruti WagonR

दरम्यान, मारुती वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून ते 7.42 लाख रुपयांपर्यंत आहे. जर तुम्ही सुद्धा नवीन कार घ्यायचा विचार करत असाल तर ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.