Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming EV Cars : 2024 मध्ये लॉन्च होणार या इलेक्ट्रिक SUV ! देणार 550 किमी रेंज, पहा यादी

0

Upcoming EV Cars : 2023 या मागील वर्षात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 2024 या चालू वर्षात अनके कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत.

देशात सध्या इलेक्ट्रिक कार खरेदीकडे ग्राहकांचा कल असल्याचे पाहायला मिळत आहे. 2024 मध्ये देखील इलेक्ट्रिक कारला प्रचंड मागणी राहणार असल्याने टाटा, महिंद्रासह अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहेत.

महिंद्रा XUV300 EV

महिंद्रा XUV300 EV
महिंद्रा XUV300 EV

महिंदा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या XUV300 एसयूव्ही कारमध्ये इलेक्ट्रिक पर्याय दिला जाणार आहे. XUV300 कारचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात या वर्षी लॉन्च केले जाणार आहे. त्यानंतर ही एसयूव्ही कार EV पर्यायासह लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये 10.5 इंचाचे इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाईल. कारमध्ये 40 Kwh बॅटरी पॅक पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकी eVX

मारुती सुझुकी eVX
मारुती सुझुकी eVX

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार eVX एसयूव्ही 2024 या चालू वर्षात लॉन्च केली जाणार आहे. 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये eVX इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली होती. कारमध्ये 60Kwh बॅटरी पॅक दिला जाईल. तसेच ही कार सिंगल चार्जमध्ये 550 किमी रेंज देण्यास सक्षम असेल.

BYD Seal

BYD Seal
BYD Seal

BYD कार उत्पादक कंपनीकडून देखील त्यांची 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये Seal इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली आहे. BYD Seal इलेक्ट्रिक कारमध्ये दोन बॅटरी पॅक दिले जाणार आहेत. 61.4 kwh आणि 82.5kwh असे दोन बॅटरी पॅक कारमध्ये दिले जातील.

टाटा हॅरियर EV

टाटा हॅरियर EV
टाटा हॅरियर EV

टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक इलेक्ट्रिक कार 2023 मध्ये लॉन्च करण्यात आल्या आहेत. तसेच 2024 मध्ये टाटा त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. टाटा मोटर्स त्यांची हॅरियर EV लवकरच लॉन्च करणार आहे. 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये टाटाने त्यांची हॅरियर EV कार प्रदर्शित केली होती. हॅरियर EV कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक दिला जाणार आहे.